अ.भा.अं.नी.स.शाखा ब्रम्हपुरी यांच्या वतीने आयोजन
ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा ब्रम्हपुरीच्यावतीने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ :०० वाजता पंचशिल वसतिगृह मैदान ब्रम्हपुरी येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यातयेणार आहे. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक तथा सहअध्यक्ष व बुवाबाजींचे कर्दनकाळ ,प्रख्यात बुद्धी प्रामाण्यवादि विचारवंत प्रा. श्याम मानव यांचे ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ तसेच जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान घेण्यात येणार आहे.
कर्यक्रमाच नियोजन अँड.गोविंदराव भेंडारकर,डॉ.खिजेंद्र गेडाम ,श्री.सूजित खोजरे ,प्रा.बालाजी दमकोंडवार ,श्री.शशिकांत बाँबोळे,श्री.अभिजीत कोसे ,या समितीची भूमिका देव धर्माला विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध आहे.हीसमिती प्रबोधन करून सामान्यजनतेला भोंदुपासून सावध करणार.खरे संत ,समाज सुधारक यांचे वैचारिक जनजागृती कार्य पुढे सुरू ठेवून निकोप निर्भीड व विज्ञाननिष्ठ आनंदी समाज निर्मिती साठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.यांच्या सानिध्यात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले.
तरी जाहीर व्याख्यानास आपन आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबासह उपस्थित राहून सदर व्याख्यानाचा बहूसंख्य लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीशाखा ब्रम्हपूरी यानी केले आहे.