সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 08, 2017

नोटबंदीच्या वर्षपूर्तीला चंद्रपूर काँग्रेस तर्फे ‘काळा दिवस’

चंद्रपूर/ प्रतिनिधी : (ललित लांजेवार)
गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने काय साध्य झाले, फायदा झाला की तोटा याची चर्चा सुरू असतानाच, नोटाबंदीचे औचित्य साधून विरोधकांनी देशभर उग्र आंदोलन केले. त्याचेच पडसाद चंद्रपुरात देखील पाहायला मिळाले. बुधवारी (दि. ८)चंद्रपूर शहरात काँग्रेस च्या दोन गटाकडून नोटबंदी विरोधात  काळा दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय अर्थव्यस्थेतील सर्वात मोठा काळा दिवस म्हणून आज चंद्रपूर शहर महानगर पलिकेसमोर विदर्भ किसन मजदुर संघाच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. या वेळी काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात राहुल पुग्लीया,नगरसेवक देवेंद्र बेले, यांच्या सह अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार नारेबाजी करत हातात फलक घेऊन व काळ्या फिती टी शर्ट लाऊन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.

तर दुसरीकडे वडेट्टीवार गटातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीकडून देखील शहरातील जटपुरा गेट येथे काळा दिवस पाडण्यात आला होता.यावेळी  चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष  नंदू नागरकर,प्रकाश देवतळे,यशः यौवक काँग्रेस,महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते.

या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून काँग्रेस तर्फे शहरभर पाळला गेला. 


:

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.