সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 16, 2017

‘‘विल यु मॅरी मी’’ ने जिंकली प्रेक्षकांची मने

चंद्रपूर- 57 वी महाराश्ट्र राज्य हौषी मराठी नाटय स्पर्धा चंद्रपूर केंद्रात दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजी
सायं. 7.00 वा. योगेष मार्कंडे लिखित व संतोश चोपडे दिग्दर्षित ‘विल यु मॅरी मी’ हे नाटक सादर
झाले. सादरकर्ती संस्था सहयोगी कलावंत सां. षै. सां. संस्था, वर्धा यांनी उत्तम सादरीकरण करुन
प्रेक्षकांची मने जिंकली.



 थोडक्यात कथानक असे आहे की, मोहन माने हा आपल्या तिसÚया पत्नीला घटस्फोट देणार त्या
दिवसापासुन नाटकाची सुरुवात होते. मोहनच्या पहिल्या दिवंगत पत्नीपासुन प्रकाष नावाचा मुलगा आहेप्रकाषची स्वतःची एक कंपनी आहे. पण ती सुध्दा डबघाईला आली आहे. मोहनची दुसरी पत्नी म्हणजे
त्याची म्हेवणी कामीनी आणि आता मोहन चैथ्या लग्नाला तयार आहे हॅपी गो लकी या स्वभावाच्या
मुलीषी तो लग्न करणार आहे आणि त्याचा मुलागा प्रकाष हा देखील छाया नावाच्या मुलीच्या प्रेमात
आहे हे समजते. कामीनीने आता सरपटे नावाच्या माणसाषी लग्न केले आहे. त्याला तीने अगदी नंदीबैल
बनवले आहे. मोहनची तिसरी पत्नी मोहीनी अभय या पतपेढीच्या मालकाषी लग्न करणार असते. असा
मामला आहे. प्रत्येक जोडप्यांचे लग्न ठरले म्हणून मोहन एकत्रित एक काॅकटेल पार्टी देतो. त्या
पार्टीमध्ये एक गेम ठेवलेला असतो की प्रत्येकाने आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल खोटं बोलायचं असतंपण्
ा ते खोटं नसून खरचं बोलत असतात. त्यावरुन प्रत्येकाची व्यक्तीरेखा काय आहे हे समजणे सोपे
जाते आणि अचानक पार्टीमध्ये एक वकील हजर होतो आणि एका इसमाने मृत्यूपत्रात तिस कोटीची
प्रापर्टी प्रकाषला दिल्याचे सांगतो. त्या इसमाचे प्रकाषच्या आईषी संबंध होते आणि प्रकाष त्याचा
मुलगा असतो. अर्थात पूर्वी यामध्ये एका प्रसंगात मोहनच्या आयुश्यात आलेली प्रत्येक स्त्री तो नपुंसक
आहे हे सांगते. पण तो हे सांगू षकत नाही आणि कुणाला षंका येवू नये म्हणून तो अनेक स्त्रीयांषी
लग्न करतो हे तो कबुलही करतो. तिस कोटी रुपये प्रकाष आणि त्याच्या पालाकांना मिळणार असतात.
त्यामुळे प्रकाषचे पालकत्व मिळावे म्हणून प्रत्येकाची धडपळ सुरु होते. पण सरपटे यांचा संपत्ती
स्विकारायला दिलेल्या नकारामुळे सर्वांना पैषाबद्दल उपरती होते. सर्वजण तो पैसा नाकारतात व त्यांना
नाते संबंधाचे मोल कळायला लागते. पूर्वी वाईट चारित्र्याच्या वाटणाÚया स्त्रिया सन्माननीय वाटायला
लागतात आणि मनोरंजन पध्दतीने लोकांना हसवत खेळवत नाटकाचा सुखांत होतोदिग्दर्षकाने
संहितेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात बÚयापैकी यषस्वीही झाले आहे.
त्यात या नाटकाचे विषेश कौतुक म्हणजे त्याचं सुंदर नेपथ्य, पण प्रकाष योजनाच्या घोळामुळे रसभंग
होतो. सरपटे यांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. प्रकाष वगळता बाकी सगळे आपली
भुमिका ठिक ठाक केली आहे. मात्र प्रकाषच्या पात्राने योग्य ते योगदान भुमिकेसाठी दिलेले नाही. म्हणून
नाटकात अभिनयाची कमतरता जाणवते. पण तरीही एक सकारात्मक संदेष देणारे मनोरंजनपर नाटक असा
नाटकाचा उल्लेख करावा लागतो

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.