सरपंचांच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेची कारवाई
चंद्रपूर - मेहा बुज येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे आदी तक्रारी होत्या.

सरपंच उषा भोयर आणि गावक-यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. यात ते दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. त्यानुसार मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात. यापुढे सूचनांचे पालन केल्यास बडतर्फ करू, अशी ताकिद देण्यात आली आहे.