(चंद्रपूर:ललित लांजेवार)
सावली तालुक्यातील शिर्शी गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अंगणात शेकोटीजवळ जेवत बसलेल्या जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ओढत नेले होते.त्या मुलीचा तब्बल ५ दिंसानंतर शोध लागला असल्याची माहिती आहे. सोमवारी हि मुलगी आजीसोबत शेकोटी जवळ बसून जेवत असतांना संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान तिला त्या परिसरातील बिबट्याने मागून हल्ला करत जंगलात खेचत नेले होते.त्यामुळे तिचे फक्त रक्ताने माखलेले कपडे मिळाले होते , त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या ५ दिवसांपासून वनविभाग व गावकऱ्यामार्फत या मुलीचा शोध घेणे सुरु होत.तब्बल ५ दिवसानंतर जंगलात त्या मुलीच्या डोक्याची कवटी ही गावाजवळ असलेल्या नाल्यालगत सापडली आहे,डोक्याच्या कवटीचे संपूर्ण मास फस्त झाले असून आणखी अवशेषांचा शोध घेणे सुरु आहे.परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने मोठ्या सावधगिरीने ५ दिवसांपासून शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास सावली वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या निरीक्षणात सुरु आहे.