पोडसा येथे अंनिसच्या सहकार्याने पोलिस विभागाचा स्तूत्य उपक्रम
गोंडपिपरीः रात्रीची वेळ... गावातील प्रमुख ठिकाणी गावकÚयांची मोठी गर्दी जमलेली... आणि मंत्रांच्या लयबध्द उच्चारांसह हवनकुंडात हळू हळू गाईचे षुध्द तूप टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली व पाहता पाहता केवळ मंत्रषक्तीने प्रज्वलीत अग्नीसह हवन पेटू लागले... अन गावकÚयांमध्ये चर्चासुरू झाली... ‘हा तर चक्क चमत्कार!’ ‘ही तर दैवी षक्ती!’
परंतू हा चमत्कार किंवा दैवी षक्ती नसून तथाकथित चमत्कारांच्या नावाखाली बाब-देव्या-मांत्रिकांद्वारे फसवणूकीसाठी करण्यात येणारा एक वैज्ञानिक प्रयोग होता, आणि याची जंेव्हा गावकÚयांना वैज्ञानिक कारण मिमांसा सांगण्यात आली, तेव्हां मात्र गावकÚयांना खÚया अर्थाने वैज्ञानिक दृश्टिकोन किती आवष्यक आहे याची जाणिव झाली. हा गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलिस ठाण्यातंर्गत येणाÚया पोडसा या गावात पोलिस विभागाद्वारे अंनिसच्या सहकार्याने आयोजित प्रबोधन कार्यक्रमातील मंत्रषक्तीने हवन पेटवण्याचा एक तथाकथित चमत्कार होता.
‘जादूटोणा-करणी-भुताटकी’षी संबधीत एका गंभीर घटनेच्या पाष्र्वभूमीवर गावकÚयांच्या प्रबोधनासाठी लाठी पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी षेखर देषमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात अ.भा.अं.नि.स.चे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी जादूटोणा विरोधी कायदा, बुवाबाजी, भूत, तंत्र-मंत्र-करणी, देवी अंगात येणे आदि विशयांवर तथाकथित चमत्कारांच्या भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्षन केले. कार्यक्रमाला उपविभागिय पोलिस अधिकारी षेखर देषमुख, पोलिस निरिक्षक कुमारसिंह राठोड, अंनिसचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख निलेष योगेष पाझारे, सरपंच सौ. संगिता रायपूरे, पोलिस पाटील सौ. निर्मलाताई येलमूले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी षेखर देषमुख यांनी अंधश्रध्दा व बुवाबाजीला बळी न पडता जीवनात वैज्ञानिक दृश्टिकोनाचा स्वीकार करण्याचे आवाहन गावकÚयांना केले. गावकÚयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरिक्षक कुमारसिंह राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समतादूत सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्षन देविदास सातपूते यांनी केले. कार्यक्रमाच्या यषस्वितेसाठी राहूल वाघाडे, प्रविन घ्यार, रविंद्र चैधरी, कैलास लोनारे, महेंद्र चापले, तिरूपती बोबाटे, दक्षिण येलमूले, सोनू भोयर, रमेष चनकापूरे, गणपती कूरवटकार, पवन चनकापूरे, प्रफूल येलमूले, गणेष सातपूते, रविंद्र चनकापूरे, चंदू येलमूले, सुरेष येलमूले, परषुराम येलमूले यांनी परिश्रम घेतले.