সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 12, 2017

थंडीत गारठलेल्या बेघर गरजवंतांना भूमिपुत्रांनी दिली मायेची ऊब

चंद्रपूर / (ललित लांजेवार)
 सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. या कडाक्याच्या थंडीत जे बेघर, गरीब आहेत, अशा गरजवंतांना चंद्रपूरच्या "भूमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय संस्था" यांनी सामाजिक  पुढाकार घेऊन थंडीत गारठणाऱ्या गरजु आणि बेघर लोकांना ब्लैंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे.

ज्यांना घर आहे जे आर्थिक दृष्ट्या सधन आहेत, अशे व्यक्ती कडाक्याच्या थंडीत उबदार कपड्याने स्वतः चे संरक्षण करतात, मात्र ज्यांना निवारा नाही. ज्यांना पुरेसे वस्त्र नाहीत, जे रस्त्याच्या कडेला  उघड्यावर जीवन व्यतीत करतात अशांचे काय ? याचा सहानुभूती पूर्वक विचार करीत शहरातील रस्त्याच्या कडेला उघड्यावर थंडीच्या कडाक्यात वास्तव्य करणारे, सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण, मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गरिबांन, बसस्थानकात व परिसरात रात्र घालवणारे यांना थंडीत संरक्षण मिळावे, त्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी" भूमिपुत्र एकता युवा बहुउद्देशीय संस्था" यांच्यामार्फत चंद्रपूर शहराच्या विविध ठिकाणी रात्री थंडीत ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
.हल्ली वाढदिवस साजरा करण्याचे मोठ्या प्रमाणावर फॅड आलेले आहे. वाढदिवस कुटुंबात साधेपणाने साजरा केला, तर काहीच हरकत नाही. मात्र, अनेक लोक आपला वाढदिवस हजारो, लाखो रुपये  खर्च करून मोठमोठे बॅनर, कटआऊट लावून, मित्रमंडळी, कार्यकर्त्यांना मोठमोठ्या हॉटेल- धाब्यांवर रंगीत- संगीत भोजन घालून, रात्री बारा वाजता फटाक्‍यांची आतषबाजी करत अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसतात. अपवादाने कोठेतरी रुग्णालयात फळ वाटप, अंध शाळेत खाऊ, साहित्य वाटप केले जाते.

मात्र या भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या  पदाधिकारी सदस्यांचे वाढदिवस हे नेहमी इतरांपेक्षा वेगळे करण्याचे ठरवीतात.वाढदिवस असले की हे लोक केक कापण्यापेक्षा, फिरायला जाण्यापेक्षा, हॉटेलमध्ये पार्टी करण्यापेक्षा, पैसे काढून गरजवंतांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात .अशीच मदत थंडीतल्या दिवसात गरजवंतांना आर्थिक मदत ,भुकेल्यांना अन्न निवारा, हरवलेल्या निवारा, अशा माध्यमातून शनिवारी बस स्थानक परिसरात केली आहे . बसस्थानकात पोचायला एका गरीब महिलेला उशीर झाला त्यामुळे तिच्या गावाकडे जाणारी बस ही निघून गेली होती आता तिला बस स्थानकात रात्र घालवण्या शिवाय पर्याय उरलेला नव्हता. हे बघून भूमिपुत्र संस्थेचे सदस्यांनी तिची विचारपूस केली यानंतर तिच्या खानपानाची व निवाऱ्याची व्यवस्था ही करून देण्यात आली.
अश्या या मानुसकीची जाण ठेऊन सहकार्य करणाऱ्यांनमध्ये  चंद्रपुरचे शेकडो लोक दिवसेंदिवस संस्थेसोबत जोडली जात आहे. या संपूर्ण ब्लँकेट वाटप कार्यक्रमात चंद्रपूरच्या विविध क्षेत्रांतून असलेले नागरिक जोडून आहेत त्यात तनुजा ताई बोढाले , लक्ष्मीकांत धानोरकर , विकास हजारे , विठ्ठल रोडे, रुपेश ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष ताजणे, मनोज गोरे, महेश गुंजेकर, वसंता उमरे , किशोर तुराणकर, गणेश पाचभाई, रोशन आस्वाले, सुरेश वडस्कर, निलेश पौनकर, प्रवीण सोमलकर, नीतेश धानोरकर, अमोल मोरे, राकेश लांडे, विशाल लोहे, विकास हजारे, गुंजन ताजणे, विनोद गोवरदीपे, हितेश गोहोकर, प्रणय काकडे, मयुर मदनकर, सुजित निकोडे, करण नायर , मयुर कुळमेथे, सुबोध उरकुंडे, सुरज गेडाम, पवन मूलकलवार या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.


  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.