सांगली/प्रतिनिधी -येथील अनिकेत कोथळे या तरुणाच्या खूनाला आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास जबाबदार असणार्या सर्वांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न राहिल. त्यासाठी सरकार न्यायालयात भक्कमपणे पुरव्यानिशी बाजू मांडणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान पोलिस दलातील चुका शोधून दुरुस्थ करण्यासाठी वरीष्ठ दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.*
*पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर अनिकेत आणि त्याचा साथीदार पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी केला. अनिकेतच्या मृतदेहाची आंबोली येथे जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिकेतचे कुटुंबीय, लोकप्रतिनीधी यांच्या दबावामुळे पोलिसांचा कारणामा चव्हाट्यावर आला. त्यामुळे पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या पाच साथीदारांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी जाहीर केले.*
*या प्रकरणी कामटेसह सहा जणांना अटक झाली असून त्यांच्यासह आणखी सात जणांना निलंबीत करण्यात आले आहे. तरीही पोलिस दलाविषयी लोकांच्यात रोष कायम आहे. या प्रकरणात असलेल्या वरीष्ठ अधिकार्यासह सर्व दोषीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सोमवारी सांगलीबंदचे आवाहनही करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेतली. पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन आढावा घेतला..*