- गुजरातचे चित्र काँग्रेससाठी अनुकूल दिसत आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्यासाठी आमची चर्चा चालू आहे.
- 'मी लाभार्थी' म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही.
- नागपूरमध्ये अलिकडे हत्यांचे प्रमाण वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही काही हत्या झाल्याचे निदर्शनास आले. सांगलीची घटनाही धक्कादायक आहे. कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यात ज्या घटना घडत आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री म्हणून एकही प्रतिक्रिया मी पाहिली नाही. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा मुख्य प्रश्न असल्याचे मानले गेले असले तरी मी तसे मानत नव्हतो. मूळ प्रश्न आर्थिक कारणांमुळे होते. त्यावर आर. आर. पाटील यांनी काम केले.
- गडचिरोली हा हैदराबाद व महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास, दळणवळणापासून लांब आहे. यावर काम केले नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही, या जाणिवेतून फक्त पोलीस दल पुरेसे नाही तर इतर माध्यमातूनही काम केले पाहिजे हे आर. आर. पाटील यांनी जाणले आणि त्यावर काम केले.