সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

आसाराम, रामरहिम आणि आता............ शालिकराम

जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही दवाखान्यात जाता. मात्र, समाजात आजही असाही वर्ग आहे की, जो प्रकृती बरी नसेलतर भोंदूबाबाकडे उपचारासाठी जातो. या ढोंगीबाबांच्या जाळ्यात असे फसतात की बाहेर पडणे मुश्‍कील होऊन जाते. एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेचा चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. या अंधश्रद्धेला बळी पडण्याचे सर्वांत जास्त प्रमाण महिलांत आहे. अशाच एका बाबावर विश्वास ठेवून "माझी तब्येत ठीक होईल' अशी श्रद्धा मनात बाळगून एक महिला एका बाबांकडे गेली. तिच्यासोबत जे घडले, ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

बिघडलेल्या प्रकृतीवर उपचार करण्यासाठी गेलेल्या महिलेची प्रकृती सुधारण्याच्या नावाखाली शोषण करण्याचा प्रयत्न झाला. आसाराम, राममहिम आणि आता शालिकराम.... काय आहे की कथा..... चला वाचूया.... काव्यशिल्प डिजिटल मीडियाचे संपादक ललित लांजेवार यांचा हा.... 

        स्पेशल रिपोर्ट..           



  •    चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर चिचपल्ली येथून गाव. येथून जवळच अजयपूर नावाने छोटेशे गाव आहे. तसे हे गाव झोपला मारुतीच्या नावाने प्रसिद्ध आहे. कुणीही या दर्शन घ्या. नवस बोला. ते फेडा, ही पीढीजात परंपरा याही पीढीने जोपासली. या मंदिरात जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून शेकडो श्रद्धाळू भक्त येतात. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसराचा चांगलाच विकास केलाय. खरंतर हे मंदिर पिंपळझोरा येथे आहे. मात्र, त्याची ओळख अजयपूरच्या नावाने आहे.
  • येथून जवळच असलेल्या हळदी गावच्या एका 25 वर्षीय महिलेची तब्येत वारंवार बिघडत होती. ही महिला डॉक्‍टरांकडे उपचारासाठी न जाता अजयपूरच्या झोपला मारोती येथील एका भोंदूबाबाकडे गेली. मागील अनेक दिवसांपासून ही महिला आपल्या पतीसोबत या महाराजाकडे उपचारासाठी यायची. मागच्या गुरुवारीदेखील ती आपल्या पतीसोबत उपचारासाठी बाबांकडे आली.
  • रात्री जेवण झाल्यानंतर या बाबाने या महिलेला खाटेवर झोपेसाठी सांगितले. ही महिला संकुचित मनाने या खाटेवर झोपली. तिला या बाबांवर खूप श्रद्धा होती. मात्र, या श्रद्धेचा असाही टोक असेल, याची तिला पुसटशी कल्पना नव्हती. ही महिला खाटेवर झोपली. त्या मंदिराच्या पूजा-याला सोबत घेऊन तिच्या अंगावर एक कापड टाकण्यात आला. नंतर तिला या बाबांने चक्क निर्वस्त्र होण्यास सांगितले. तेव्हा तिच्या अंगावर काटे उभे झाले. काय करावे, सूचत नव्हते. आपल्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय, याचा संशय तिला आला. तिने लागलीच आपल्या नवऱ्यासोबत पळ काढला. थेट मूलचे पोलिस ठाणे गाठले. भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून या भोंदू बाबाला व त्याच्या साथीदार पुजाऱ्याला येथून अटक केली. शालिकराम कुमरे (वय 60) आणि पूजारी प्रभाकर जाजुलवार (वय 50) असे आरोपींची नावे आहेत
  • पोलिसांनी या भोंदूबाबा विरोधात कलम 354, 323 तसेच 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी या दोन्ही आरोपींना मूल येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.



  • दोन दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे  प्रा. श्‍याम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनावर जाहीर व्याख्यान झाले व लगेचच चंद्रपूर जिल्ह्यात ही एक दुर्दैवी घटना घडली. अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा, बाधा इत्यादींमुळे भोंदूबाबाकडून समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक वा आर्थिक शोषण होत आहे. भोंदूबाबाचा अदभूत व चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि यांची समाज विघातक व नुकसानकारक कृत्ये यामुळे समाजाची घडीच विस्कटली आहे.







শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.