
वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करावा.शिक्षकांना करावी लागणारी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करून केन्द्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीला लागलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. MSCIT परीक्षेची अट रद्द करण्यात यावी. विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांना घेऊन आज जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.
.