१७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन
मुंबई, प्रतिनिधी: मतदारांमध्ये उत्कृष्टरित्या जनजागृती मोहीम राबविणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी‘नॅशनल मीडिया अवार्ड’ पुरस्कारासाठी दि. १७ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
मतदारांमध्ये निवडणूक, मतदार नोंदणी आदी विषयक उत्कृष्टरित्या जनजागृती मोहीम राबविणाऱ्या प्रिंट मीडीया, दूरचित्रवाणी (टि.व्ही.) माध्यम, रेडियो आणि ऑनलाईन (इंटरनेट) किंवा सोशल मीडिया या चार माध्यमांना भारत निवडणूक आयोगाच्यावतीने‘नॅशनल मीडिया ॲवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून १७ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जनजागृती मोहिमेचा दर्जा,व्यापकता, जनतेवर पडलेल्या सकारात्मक प्रभावाचा पुरावा यासह अन्य बाबींचा विचार पुरस्कारांसाठी केला जाईल.
२०१७ या वर्षात केलेल्या जनजागृतीच्या माहितीसह प्रसिद्धी माध्यमांनी आपला प्रस्ताव पवन दिवाण, अवर सचिव (संज्ञापन), भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली ११०००१, ई-मेल- diwaneci@yahoo.co.in,दूरध्वनी क्र. ०११-२३०५२१५३ या नावाने तयार करावा. हा प्रस्ताव विहीत मुदतीच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग,मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,मुंबई-३२ यांच्याकडे सादर करावा.
पुरस्कारासाठी पात्रता, आवश्यक बाबी
मुद्रित माध्यमांसाठी - संबंधित कालखंडात केलेल्या कामांचा सारांश, बातम्यांची तसेच लेखांची संख्या, प्रसिद्ध केलेल्या मजकुराचे एकूण स्वे.सें.मी. क्षेत्रफळ, एक पीडीएफ सॉफ्ट कॉपी किंवा संबंधित वेब पत्त्यावरील वृत्त, वर्तमानपत्र, लेखांची संपूर्ण आकारातील छायाचित्रीत, प्रिंट प्रत, प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील,कोणतीही इतर माहिती.
दूरचित्रवाणी (टि.व्ही.) आणि रेडिओ माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत चालविण्यात येणाऱ्या मोहिमेदरम्यान प्रसारित कार्यक्रमांचा कालावधी, वेळ, प्रत्येक स्पॉटच्या प्रसारणासह एकूण साहित्य (सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राइव्हमध्ये) आवश्यक आहे, एकूण प्रसारण वेळेची बेरीज,मतदाराची जागरुकता यावर बातम्या किंवा कार्यक्रम. तसेच याचसारख्या वृत्तविशेष, कार्यक्रमांच्या प्रसारणाचा दिनांक, वेळ याबाबत वरील माध्यमांमध्ये एकूण साहित्य. प्रत्यक्ष सहभागासारख्या इतर कोणत्याही कामाचा तपशील, कोणतीही इतर माहिती.
ऑनलाईन माध्यमांसाठी - संबंधित कालावधीत केलेल्या पोस्ट, ट्वीट, ब्लॉग, कॅम्पेन, लेख यांचा सारांश. संबंधित लेखाची पीडीएफ कॉपी किंवा वेब ॲड्रेसची लिंक. प्रत्यक्ष सहभाग असल्यास त्याचा पुरावा, मतदारांवर झालेला परिणाम याबाबत आदी माहिती.
नियम व अटी
हिंदी व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त असणाऱ्या प्रवेशिकांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले असणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रवेशिकामधील साहित्यातील पहिल्या १० मिनीट कालावधीतच या परिक्षकांना प्रवेशिकेचे मूल्यमापन करता येईल अशा प्रकारचे असावे. प्रवेशिकेवर नाव,पत्ता, दूरध्वनी, फॅक्स, इ-मेल पत्ता आणि माध्यमाचे नाव असणे आवश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.