সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 13, 2017

आमदार वडेट्टीवार यांची शेतकऱ्याला तातडीची मदत

 चंद्रपूर /प्रतिनिधी:
रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील शेतकरी श्री.दिवाकर काशीनाथ दरमळे यांच्या गुराच्या गोठ्याला अचानकपणे रात्री 9.30च्या सुमारास आग लागली लागलेल्या आगीमुळे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या एक दुधाळू जर्सी गाय व बैल या आगीत मृत्यू पावले तसेच दोन गाई एक गोरा चार मोठे बैल गंभीर स्वरूपात जखमी झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन पहिलेच दुष्काळग्रस्त जीवन जगत असलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबावर संकट कोसळले या गंभीर प्रकाराची माहिती ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी या शेतकऱ्याला तातडीची मदत जाहिर केली व  तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांन मार्फत 7500 रुपये मदत देऊ केली. या घडलेल्या प्रकारावर आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले मी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य प्रकारे  पुरवठा करून शासकीय आर्थिक मदत देण्याचे संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना  निर्देश दिले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अरुण कोलते महासचिव हरिदास बोरकर ,नगरपंचायत चे गटनेता नरेंद्र भैसारे, नगरसेवक युनूस शेख ,सरपंच रजनी नन्नावार ,दादाजी उईके पोलीस पाटील भूपेश नागदेवते ,अशोक सहारे, मोरेश्वर ज्ञानवाडकर यशवंत गंडाटे, चंद्रकांत डोये, महेश मडावी सोमेश्वर जरमळे,मनोज नरवळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू वानखेडे व बहुसंख्य ग्रामवासी उपस्थित होते.





.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.