इको-प्रो तर्फे मातीची व विना रंगाची मुर्ती बाबत जनजागृती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रो ग्रीन गणेशा अभियान अंतर्गत मातीची व विना रंगाची मुर्तीची स्थापना करून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे आज इको-प्रो कार्यालयातून मातीची आणि विना रंगाची मूर्ति गणेशभक्तानी घरी नेऊन स्थापना केली.
यंदाच्या गणेशोत्सवा करीता आज इको-प्रो कार्यालयातुन अशा पर्यावरणपुरक गणेशाच्या मुर्ती गणेश भक्तानी नेण्यात आले त्यात श्री रमेश मुलकलवार, निवृत्त विस्तार अधिकारी (शिक्षक), श्री हरीश ससनकर, शिक्षक, परीक्षीत सराफ, सुजीत घाटे, सुमीत कोहळे, नीलेश मड़ावी आदीचा समावेश होता तर काहीनी मुर्तीकारांकडे विना रंगाची मुर्तीची मागणी केलेली होती. या अभियानात सहभागी होत अनेकांनी पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना केलेली आहे. पुढील वर्षी सदर ग्रिन गणेशा अभियान अंतर्गत कुंभार बांधवाच्या मातीच्या व विना रंगाच्या मुर्ती नागरीक कशा पध्दतीने जास्तीत जास्त प्रमाणात घेतील यावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून गणेशोत्सवा दरम्यान होणार प्रदुषण टाळता येतील. घरीच्या घरी गणेशा विसर्जन व निर्माल्याचे खत तयार करण्यास नागरीकांचा प्रतीसाद वाढत असल्याने दरवर्षी एक कंुडीत एक झाड आणी तयार झालेले खत यातुन दरवर्षीच्या गणेशाचे स्मृती जपण्याची कल्पना नागरीकांना आवडली आहे. संस्थेतर्फे याचा प्रचार आणी प्रसार पुढील वर्षीपासुन मोठया प्रमाणात केला जाणार आहे.
सदर ग्रिन गणेशा अभियान राबविण्याकरीता पर्यावरणमीत्र तथा संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे मार्गदर्शनात इको-प्रो संस्थेच्या ‘पर्यावरण विभागचे प्रमुख’ नितीन रामटेके, उपप्रमुख प्रज्ञा सराफ, अमोल उत्तलवार, वैभव मडावी, सुमीत कोहळे, हरीश मेश्राम यांचे सह इको-प्रो चे सदस्य सहकार्य करीत आहेत.