रात्री 12 वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन
माणुसकी चा जीवंत झरा मा.पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डी साहेब.
चंद्रपूर/प्रतिनिधी:
रक्तदान करतांना चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक .डॉ. महेश्वरजी रेड्डी,आणि रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चमू |
चंद्रपुर येथील शासकीय रुग्णालय,जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते.वणी,गडचिरोली,आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात.कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तसाठी जीवाचे रान कराव लागते.रक्ताअभावी कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण सुद्धा वनवन भटकावे लागते.
अशीच घटना आज दिनांक 15/09/18 ठीक रात्री 11.00 ला घडली. शबाना सय्यद नामक स्त्री गर्भवती असल्याने तिच्या शस्त्रक्रियेसाठी A- रक्तगट ची आवश्यकता होती. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले.अशावेळी गरजूंचा रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनशी संपर्क झाला.तत्काळ सोशल मीडिया वर् पोस्ट झळकली.इतक्यात चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक श्री.डॉ. महेश्वरजी रेड्डी यांचा फोन संस्थेला आला. A- रक्तगट असल्याने त्यांनी तयारी दर्शवली. इथेच मानुसकिचा जिवंत झरा अनुभवायला मिळाला.या वेळी क्षणाचाही विलंब न करता रक्ताचे महत्त्व ओळखून अधीक्षक यांनी रात्री 12 वाजता शासकीय रुग्णालय गाठले.व् मोठ्या उत्साहाने रक्तदान करुण पोलिसातली माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दाखवून दिले.अधीक्षकांच्या या कार्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रक्तदान करतांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरजी रेड्डी |
असाच एका पोलीसातल्या माणुसकीचा परिचय चंद्रपूर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलीस शिपाई संदीप वझे यांनी ३० जून २०१८ ला दाखवला होता.एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच चंद्रपुर वाहतूक पोलीसात कार्यरत असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यानी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे.
संदीप वझे असे या वाहतूक शिपायाचे नाव असून त्यांनी कर्तव्यावर असताना एका गरजू रुग्णाला कर्तव्यावर असतांना रुग्णालयात तात्काळ रक्तदान केले. संदीप वझे हे शनिवारी दुपारी २ वाजताच्या प्रियदर्शनी चौकात कर्तव्यावर होते. अशातच त्यांच्याजवळ रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेचे काही लोक आले. मोनिका पिसे या एका सिकलसेल असलेल्या महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी संदीप वझे यांना सांगितले.त्यांनी क्षणाचाही विलंब न आपल्या कर्तव्य स्थानावर एका साथीदार पोलीस कर्मचाऱ्याची मदत घेत लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. व पोलिसातील माणुसकीचे जिवंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले. संदीप वझे यांनी रक्त दिल्याने गंभीर स्थिती टळून त्या गरजू महिलेला उपचार मिळाले.व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.विशेष म्हणजे या पोलिसाने वर्दीवर असतांना रक्तदान केले.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वरजी रेड्डी व वाहतूक पोलीस शिपाई संदीप वझे यांनी रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेला तत्काळ दिलेल्या प्रतिसादामुळे व केलेल्या मदतीमुळे आज दोन महिलांचे प्राण वाचू शकले.त्यांच्या या कार्याने निस्वार्थ सेवा संस्थेच्या लोकांनी त्यांचे आभार मानले.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या या कार्याची बातमी पोलीस खात्यातल्या कर्मचार्यांना लागताच सर्वांच्या मुखातून प्रसंशनीय शब्द झडकत होते, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केलेल्या कार्यामुळे त्याच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या कार्यामुळे पोलीस खात्यातील या दोन्ही जाबाजांचे आभार व्यक्त रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेने प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे. जर प्रत्तेकाने रक्ताची गरज बघून तत्काळ मदत केली तर आज एकही असा रुग्ण रक्तासाठी फडफडणारा आढळणार नाही असे रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले.