अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्षांकड़े मागणी
गोंड़कालीन वास्तुचे संवर्धन करण्याची मागणी
समिती अध्यक्ष डॉ. अशोक उइके यांचे प्रयत्न करण्याचे आश्वासन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा हा गोंडकालीन इतिहास आणी ऐतिहासिक वास्तूसाठी ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भ आणि छत्तीसगडपर्यतच्या भुप्रदेशावर या आदिवासी गोंड राज्यांनी तब्बल 550 वर्ष राज्य केले. त्याची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. आदिवासी गोंड़कालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची तसेच गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अनुसुचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. अशोक उइके यांच्याकड़े केली. यावेळीा त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करन्यात येईल, असे आश्वासन दिले.
देशात आणि जगातसुध्दा आदिवासी राज्यकर्त्यानी एखादया भुप्रदेशावर प्रदीर्घ काळ राज्य केल्याचे ऐकिवात नाही. चंद्रपूर जिल्ह्यांत गोंङराज्य होते. या गौरवपुर्ण इतिहासाचे साक्षीदार असणारे किल्ले, परकोट, समाध्या व मंदीरे आजही भक्कम स्थितीत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील ‘चंद्रपूर’ शहरांची निर्मीती 550 वर्षापुर्वी तर 300 वर्षापुर्वी ‘नागपुर’ शहरांची निर्मिती या गोंडराज्यांनी केली होती.
मात्र आदिवासी राज्यांच्या गोंडकालीन इतिहासाची साक्षीदार 'किल्ले' आणि अनेक 'वास्तु' दुर्लक्षीत आणी उपेक्षीत आहेत. सोबतच प्रगल्भ इतिहास असतांना सुध्दा स्थानिक नागरिक सुध्दा हा गोंडकालीन इतिहास विसरत चालले आहेत. आदिवासी गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते म. हे सुध्दा आज आम्हाला माहीती नाही ही शोकांतिका आहे. सदर गोंडकालीन इतिहास विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात येणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात देश आणि जगाचे राजे, त्यांचा कालखंड अभ्यासला जातो. मात्र स्थानिक पातळीवरील इतिहास सांगितला जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील इतिहास अभ्यासक्रमात असणे गरजेचे आहे.
एका मोठया भुप्रदेशावर राज्य करणारे गोंडराजे, त्यांचा पराक्रम, त्यांच्या जगविख्यात वास्तु, राणी हिराईचा राज्यकारभार, बांधलेली मंदिरे, समाधीस्थले अशाप्रकारे कायम दुर्लक्षित ठेवल्यास इतिहासजमा होईल. येथील गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते, याचा इतिहास नव्या पिढींसमोर आला पाहिजे. कायम वनात राहणारे आदिवासी समुदाय संघटित होऊन आपले राज्य निर्माण करतात. दिल्लीच्या बादशहाची सुद्धा या राज्यांवर नजर होती, भक्कम किल्ले-परकोटाचे व वास्तुचे बांधकाम करतात, 500- 550 वर्ष सतत राज्य करतात ही ऐतिहासिक दृष्टया मोठी बाब आहे.
शहीद वीर बापूराव पुलेश्वर शेडमाके
1857 मधे देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध अभूतपूर्व उठावनी झाली होती. त्याच धर्तीवर चंद्रपुर परिसरात सुद्धा इंग्रज सत्तेविरुद्ध बापूराव शेडमाके यांनी बंड पुकारले होते. सैन्य जमवून युद्ध पुकारले होते. शेवटी कपटनितिने पकडून त्यांचेवर खटला चालवुन 1858 मधे फाशी देण्यात आली होती. चंद्रपुर च्या इतिहासातील ही एक मोठी घटना आहे.
गोंडराजे यांचा बालेकिल्ला-राजवाड़ा
गोंड़कालीन इतीहास आजही विदर्भातील अनेक नागरिकांना माहीती नाही. यासोबतच महत्वाचे आणि दुर्देवी बाब म्हणजे या गोंडराज्यांचा ‘बालेकिल्ला- राजमहल’ ब्रिटीशकाळापासून कैदाचे ‘कारागृह’ ठेवण्यात आले असून, स्वांतत्रप्राप्तीनंतरही येथे कारागृहच असून येथे विविध गुन्हातील कैदी शिक्षा भोगत आहेत. सदर बालेकिल्ला खाली करून ‘जिल्हा कारागृह’ इतरत्र स्थानांतरण करण्याची गरज असून अशी इको-प्रो ची मागणी आहे. तसेच गोंडकालीन इतिहास संवर्धनासाठी या प्रदेशातील ऐतिहासिक वास्तुचा, स्थळांचा पर्यटन विकास करण्याची गरज आहे. त्याकरिता राज्यसरकारने पावले उचलण्याकरीता मागणी लावून धरण्याची विनंती इको-प्रो कडून केली आहे. सोबत सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियान ची सचित्र माहिती देण्यात आली, यावेळी या अभियानाची माहिती पुस्तिका सुद्धा भेट देण्यात आली.