সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 04, 2018

बुधवारपासून चला नाटकाला

     राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव

          मोबाईल साठी चांगल्या दर्जाचा हेडफोन - क्लिक करा आणि बघा 






नागपूर - सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 57 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवातील प्रथम पुरस्कार प्राप्त नाटकांचा दिनांक 5 ते 7 सप्टेंबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक, 8 सप्टेंबर रोजी महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल.  
दिनांक, 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रभाषा परिवार, नागपूर द्वारा निर्मित हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त नाटक ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकाद्वारे महोत्सवाची सुरुवात करण्यात येईल. दिनांक, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नाटक रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे, सोलापूर निर्मित बालनाट्य स्पर्धेतील विजेता नाटक ‘तेलेजू’, दुपारी 12 वाजता संस्कृत नाट्य स्पर्धेचे विजेता के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई संस्थेचे नाटक ‘देवशूनी’, सायंकाळी 7 वाजता मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे विजेता भद्रकाली प्रॉडक्शन्स मुंबई निर्मित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात येईल.
दिनांक, 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता नाट्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी ‘मुंबई टू झाडीपट्टी व्हाया नागपूर’ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. या कार्यक्रमात अभिनेता भारत गणेशपुरे, श्वेता पत्की-देशपांडे, आदित्य देशमुख, श्याम आस्करकर, अविनाश पाटील, राजेश चिटणीस यांची विशेष भूमिका राहणार असून कार्यक्रमांची संकल्पना दिग्दर्शक स्वप्निल बोहटे यांनी तर लेखन नितीन नायगांवकर यांनी केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.