সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 03, 2018

ऍलोपॅथी औषधांचा साठा; बोगस डॉक्टर सापडले

चंद्रपूर मनपातर्फे कारवाई


हेल्थ प्रोडक्ट  बघण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा 



चंद्रपूर  - चंद्र्पुर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सुनील खंडेलवाल वसमीर पाल या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.


मनपा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मनपा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खेरा यांनी बोगस डॉक्टरशोध मोहीम पथकासह निकुंज हॉस्पिटल, भिवापूर वॉर्ड येथे दिनांक २९/०८/१८ रोजी भेट दिली. तेथे निकुंज हॉस्पिटलचे संचालक सुनीलखंडेलवाल हे महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा १९४९ अंतर्गत निकुंज हॉस्पिटलची नोंदणी मनपाकडे करण्यात आलेली नसतांना,अनधिकृतरित्या १० खाटांचे नर्सिंग होम चालवीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ऍलोपॅथी औषधांचा साठा आढळून आला.

त्याचप्रमाणे समीर पाल नावाचा व्यक्तीही वैद्यकीय व्यवसाय करतांना आढळून आला. त्यांच्या दवाखान्यात चौकशी केली असता घरगुतीजागेत ऍलोपॅथी औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असतांना आढळून आले. महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्याकलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृतअसणे आवश्यक आहे. समीर पाल यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय शैक्षणिक अर्हता तसेच महाराष्ट्रवैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत कोणतेही प्रमाणपत्र आढळूनआले नाही. चौकशी दरम्यान सदर व्यावसायिक ऍलोपॅथी औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो असे आढळून आले. चौकशीत दवाखान्यातऍलोपॅथी औषधे आढळून आली.
त्यामुळे तपासणी चमुद्वारे सुनील खंडेलवाल व समीर पाल या दोन्ही व्यवसायीकां विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल करण्यात आली आहे.  सदर कारवाई मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. अंजली आंबटकर यांच्या मार्गदर्शनातमनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खेरा, सहायक आयुक्त श्री. धनंजय सरनाईक, श्री.सचिन पाटील, श्री. नामदेव राऊत यांच्यापथकाद्वारे करण्यात आली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.