अभियानाच्या तिसऱ्या टप्पाचे श्रमदानास सुरूवात
तलावास लागुन असलेल्या किल्ला भिंतीवरील झाडी-झुडपे काढण्याचे काम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास अखंड 500 दिवस पुर्ण झाले असुन या अभियान अंतर्गत आता तिसऱ्या टप्पाच्या श्रमदानास सुरूवात करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला परकोटाची स्वच्छता करण्यास ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत 1 मार्च 2017 रोजी सुरूवात करण्यात आलेली होती. या अभियान अंतर्गत ज्या दिवशी इको-प्रोच्या सदस्यांनी श्रमदान केले तेच दिवस मोजीत आज अभियानाचा प्रत्यक्ष श्रमदानाचे 500 दिवस पुर्ण केले आहे. आज अभियानाचा 501 वा दिवस होता आज अभियानाचा तिसरा टप्पा सुरूवात करण्यात आली आहे. रामाळा तलावास लागुन असलेले किल्ल्याची भिंत व यामधुन निघालेली झाडे यामुळे किल्लास ठिकठिकाणी तडे जात आहे. तलावाच्या बाजुस असल्याने किल्ल्यास अधिक धोका होण्याची शक्यता अधिक असल्याने हि झाडे-झुडपे काढण्याचे अत्यंत जिकरीचे कामास इको-प्रो च्या सदस्यांनी आज सुरूवात केली आहे.
खाली रामाळा तलावाचे पाणी, उंच किल्लाची भिंत अशा जिकरीच्या कामात इको-प्रो च्या 'अॅडव्हेचंर टिमचे' सदस्य यांनी साहसीक कार्यात वापरली जाणारी साहित्य, दोरी, हारनेस, कॅरीबेनरचा वापर करीत स्वतःला हवेत लटकवुन घेत ही झाडे-झुडपे काढण्याचे काम सुरू करण्यात केले आहे. अत्यंत जिकरीचे मात्र तितकेच सुरक्षा बाबीचा विचार करून या कामास सुरूवात करण्यात आले.
सदर किल्ल्याचे हि झाडी-झुडुपे निघाल्यास रामाळा तलाव मधुन लेजर लाईटचा प्रकाश किल्लाच्या भितींवर मारल्यास रामाळा तलावाच्या किनार्यावरून यादिशेने बघितल्यास थोडया वेळासाठी आपण वेगळया शहरात असल्यास भास नक्कीच निर्माण करेल अशी आशा आणी सोंदर्याकरणाची मागणी असलेल्या इको-प्रो ने उत्साहाने या कामास सुरूवात केलेली आहे.
सदर अभियान अंतर्गत बरीच मजल मारलेली आहे. दुसÚया टप्पात किल्ला पर्यटनास सुरूवात करण्यात आलेली होती त्यानुसार नागरीकांनी सुध्दा प्रतिसाद दिला तरी पावसाळयानंतर परत किल्ला पर्यटनास सुरूवात करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियान सोबत किल्ल्याची डागडुजी, संरक्षण भिंतीचे बांधकाम व सोदर्याीकरण याबाबत शासन प्रशासन आता सकारात्मक पावले उचलत असल्याने इको-प्रो च्या सदस्यामध्ये उत्साहाचे आणी आंनदाचे वातावरण आहे. नागरीकांनी याउपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे.
आज सुरू झालेल्या तिसऱ्या टप्पाच्या श्रमदानात संस्थेचे रवि गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अनिल अडगुरवार, बिमल शहा, राजु काहीलकर, अमोल उटटलवार, सुमीत कोहळे, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अतुल रांखुडे, प्रमोद मलीक, धर्मेद्र लुनावत, कपील चैधरी, प्रतीक बदद्लवार, सुनील पाटील, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, कोमल उपरे आदी सदस्य सहभागी झाले होते.