সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

एसटी बसमधून चंद्रपूरला दारू

 बुटीबोरी - दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून रोज मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे. त्यासाठी मद्यतस्करांकडून एसटी बस, खासगी बस, ट्रकसह विविध वाहनांचा वापर केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यानंतर तेथील मद्यविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मद्यतस्करी करीत आहेत. प्रारंभी खासगी वाहनातून ते दारू तस्करी करायचे. आता दारूच्या तस्करीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसचाही वापर केला जातो. अशाच प्रकारे चंद्रपूरला जाणाऱ्या  एसटी बसच्या (एमएच ४०/ वाय ५५६३) छतावर मद्य तस्करांनी चार पोत्यात दारूच्या बाटल्या भरून ठेवल्या. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ही बस मोरभवन स्थानकावर उभी होती. बस चंद्रपूरला निघण्याची वेळ झाली असताना बसचालक गणेशसिंग रघुवीरसिंग बैस आणि सतीश लुथळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बसच्या छतावर एक नजर टाकली असता चार पोती लगेज दिसले. हे लगेच कुणाचे अशी विचारणा बसवाहक लुथळे यांनी बसमधील प्रवाशांकडे केली. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने बसचालक, वाहकांनी विभाग नियंत्रक सुशील केशवराव भुते यांच्या मार्फत सीताबर्डी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पोती खाली उतरवून तपासली असता त्यात आॅफिसर चॉईसच्या एकूण ५३२ दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्याची कंपनी किंमत १७ हजार रुपये असली तरी मद्यविक्रेत्यांनुसार ही दारू एक लाख रुपये किमतीची आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.