সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

४३०अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन लवकर द्या,अन्यथा आंदोलन छेडू :सतीश वारजूकर

 चिमूर प्रतिनिधी:
             पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात मागील अनेक दिवसापासुन विवीध कारणांनी  ४३० कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती आहे.या ४३० अंगणवाडी सेविकांना वेतनासाठी त्यांना बालवीकास प्रकल्प कार्यालयाच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहे संबंधित अधिकारी यांनी  दखल  घेऊन  अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची मागणी कांग्रेस चे जिल्हापरिषद गट नेते डॉ.सतीश वारजूकर यांनी केली आहे

          बाल विकास प्रकल्प कार्यालया मार्फत  अंगणवाडी बालवाडी चालवीली जाते.तालुक्यात एकूण अंगणवाडी सेविका व मदतनीस ५६० आहेत, त्यापैकी १३० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे माहे जून ऑगस्ट , सप्टेंबर या तीन महिन्याचे वेतन दिल्याचं गेले नाही. परंतु ४३० कर्मचाऱ्यांचे अजून हि विविध कारणास्तव वेतन रखडले असल्याने त्यांची दिवाळीच अंधारात गेली आहे.आधार लिंक न होणे व कनिष्ठ लिपिक नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कामे वेळेवर होत नाही त्यांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, ज्यांना गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन मिळत नसेल तर त्यांनी करायचे का ? असा प्रश्न निर्माण करीत अधिकारी यांनी दखल घेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे रखडलेले वेतन काढून देण्याची मागणी काँग्रेस  चे जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेता डॉ.सतीश वारजूकर व प.स सदस्य तथा गट नेता रोशन ढोक यांनी केली आहे. या रखडलेल्या अंगणवाडी सेविकांचे वेतात लवकरात लवकीर द्या  अन्यथा कांग्रेस  पक्षाचे वतीने आगडेवगडे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सतीश वारजूकर यांनी दिला


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.