चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. महावितरणने ८ ते १० नोव्हेंबर पर्यंत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम राबवण्याचा अजंटा हातात घेतला आहे .या दोन दिवस चालणाऱ्या मोहिमेत आतापर्यंत जवळपास ४५९ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. तर थकबाकीदारांपैकी १०२३ ग्राहकांनी कारवाईच्या धसका घेत या एकाच दिवशी ३७ लाख ९५ हजाराचा भरणा करून महावितरणाच्या खात्यात भर पाडली आहे . महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे थकबाकी जवळपास १३ कोटी ९७ लाखांच्या घरात पोहोचली आहे तर वाणिज्यिक ग्राहकांकडे ४ कोटी ९७ लाख झाली आहे. औदयोगिक ग्राहकांकडे १ कोटी २ लाख थकबाकी जमा झाली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ४१ लाख तर सरकारी कार्यालयाकडे १ कोटी ७३ लाख थकबाकी आहे.वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे ४० कोटी ३८ लाख तसेच कृषीपंप धारकाकडे ६१ कोटी ९७ लाखाची थकबाकी जमा झाली आहे. महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांना थकीत असलेले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाने केले आहे.
- महावितरणची ग्राहकांकडे एकुण थकबाकी पुढीलप्रमाणे
- घरगुती- १३ कोटी ९७ लाख,
- औदयोगिक -१ कोटी ४१ लाख,
- वाणिज्यिक -४ कोटी ८७ लाख,
- ग्रामिण व शहरी पाणीपुरवठा योजना- १ कोटी ४१ लाख,
- कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहक- ४० कोटी ३८ लाख,
- शासकीय कार्यालये १ कोटी ७३ लाख,
- कृषीपंपधारक ६१ कोटी ९७ लाख रुपये