সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 01, 2017

चंद्रपूर जिल्ह्याचा नेटबॉल मुले व मुलींचा संघ सांगली येथे रवाना


चंद्रपूर : ११ वी जुनिअर महाराष्ट्र राज्य नेटबॉल स्पर्धा सांगली येथे दिनांक ०३ ते ०५ नोव्हेंबर २०१७ रोजी होणा-या स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा नेटबॉल मुले व मुलींचा संघ आज दिनांक ०२  नोव्हेंबर २०१७ रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून रवाना झालेला आहे. या संघाचे प्रशिक्षण शिबिर ५ दिवस राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर यांच्या भव्य मैदानावर घेण्यात आला. या संघाला प्रशिक्षक म्हणून निखील पोटदुखे व अक्षय रगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर नेटबॉल मुलांच्या संघात नितीन कोटनाके, सनी मोहुर्ले, विजय रामटेके, सुशील दातार, अभिजित वागडे, रितिक रायपुरे, समीर पल्हाडे, निकेतन वाघमारे, हर्षवर्धन राऊत, रितिक ताजने, सौरव आगलावे, निलेश पातार, व मुलींच्या संघात चांदनी हरबडे, अपर्णा चौधरी, सिया जाधव, अश्विनी ताटकंतीवार, रिया कुनघाडकर, वैष्णवी चौधरी, श्रेया गलगले, जागृती गेडाम, तसेच संघ व्यवस्थापक म्हणून चेतन इडगुरवार व नैतीका मोहुर्ले  यांचा समावेश होता.  
  सदर स्पर्धेच्या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा नेटबॉल असोसीएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप टिकाराम जयस्वाल, नेटबॉलचे प्रशिक्षिका प्रा. शालिनी विश्वासराव आंबटकर व प्रा. विक्की तुळशीराम पेटकर तसेच प्रा. सुनील शामराव डाखोळे यांनी शुभेच्या दिले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.