नागपूर/प्रतिनिधी : दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.
केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.
दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.