সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 02, 2017

वीज केंद्र व मनुष्यबळाप्रतीचा कृतज्ञता सोहळा ...चंद्रकांत थोटवे

महानिर्मिती  "वर्धापन दिन"
कोराडी :  वीज केंद्राला अभिवादन करण्यासाठी खऱ्या अर्थाने वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वीज केंद्राच्या उभारणीपासून तर त्याच्या यशस्वी संचालनापर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये अनेकांचे वर्षोगणिक परिश्रम असतात, अशा प्रत्येकाच्या प्रती आदरभावाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो असे भावपूर्ण मत चंद्रकांत थोटवे यांनी व्यक्त केले. महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राच्या ४३ व्या वर्धापन दिन समारोपीय समारंभात ते कोराडी येथे बोलत होते.
  मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, विनोद बोंदरे, प्रदीप शिंगाडे, संचालक महाजेम्स सुधीर पालीवाल, मुख्य अभियंते अभय हरणे, राजेश पाटील, पंकज सपाटे,अनंत देवतारे, सुनील आसमवार, डॉक्टर नितीन वाघ, वर्धापन सचिव गजानन सुपे, अध्यक्षस्थानी राजकुमार तासकर प्रामुख्याने उपस्थित होते.
  स्वागतपर भाषणातून अभय हरणे म्हणाले कि, अशा कार्यक्रमातून सांघिक भावना वाढीस लागते, सुप्त गुणांचा विकास होतो, उत्साह वाढून महत्तम वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यास हातभार लागतो. अहवाल वाचनातून गजानन सुपे यांनी क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, मैदानी खेळ, रांगोळी, चित्रकला, मॅराथॉन, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान, हाउस कीपिंग, बुद्धिबळ, इत्यादींचा आढावा घेतला. यानंतर, प्रदीप शिंगाडे, विनोद बोंदरे, कैलाश चिरूटकर, सुधीर पालीवाल यांची समयोचित भाषणे झाली.

      मन लावून काम करा, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्या, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वीज उत्पादन हेच महानिर्मितीचे उद्दिष्ठ असल्याचे विकास जयदेव यांनी सांगितले. महानिर्मितीच्या मनुष्यबळाने व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शिस्तीचे पालन करीत जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. कोराडी वसाहतीत शववाहिका, जलतरण तलाव, सांस्कृतिक सभागृह, व्यायामशाळा निर्माण करण्यास्तव तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश चंद्रकांत थोटवे यांनी मुख्य अभियंत्यांना दिले. राजकुमार तासकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. भरगच्च प्रतिसादासह वर्धापन दिनाचा समारोह संपन्न झाला.

      कोराडी येथील विद्युत विहार वसाहतीतील हनुमान मंदिर मैदानात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कुबडे व प्रवीण बुटे यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश मेश्राम यांनी केले, गिरीश कुमारवार यांनी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्यभरातील वीज केंद्रांचे मुख्य अभियंते व अधिकारी-कर्मचारी  संघटनांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन केले. याप्रसंगी मानव संसाधन विभागाद्वारे निर्मित "वेलकम कीट" चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले तसेच विशेष प्राविण्यप्राप्त पाल्यांचा/अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिन निमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचे सूत्र संचालन कविता साठे व मिलिंद रहाटगावकर यांनी केले.

      कार्यक्रमाला उप मुख्य अभियंते अरुण वाघमारे, गिरीश कुमारवार, प्रदीप फुलझेले, किशोर उपगन्लावार, माजी मुख्य अभियंता किशोर नागदेवे,  अधीक्षक अभियंते राहुल सोहनी, सुनील सोनपेठकर, परमानंद रंगारी, तुकाराम हेडाऊ, जे.बी.पवार, श्याम राठोड, विराज चौधरी, पांडुरंग अमिल कंठावार, अरुण पेटकर, विजय बारंगे, महेंद्र जीवने, भूषण शिंदे, डॉ.किशोर राऊत, संकेत शिंदे, प्रसाद निकम, वीज केंद्राचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, आयोजन समिती सदस्य, विविध विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, मुले-मुली, महिला-पुरुष, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.