সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 11, 2017

आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह

 घटपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
वरोरा /प्रतिनिधी:
 जगप्रसिद्ध असलेल्या  वरोरा शहरातील  स्व. बाबा आमटे  यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या आनंदवन येथील मुखबधीर शाळेत १०व्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या गणेश शंकर निमजे (23)रा . नागभीड या विद्यार्थ्यांचा मृतदेह आनंदवनातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आनंदवनातील  विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरत चांगलीच खळबळ उडाली असून ११ नोव्हेंबर ला मृतक गणेश च्या मामाने वरोरा पोलीस स्टेशन येथे रीतसर लेखी तक्रर देऊन गणेश ची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील  गणेश निमजे हा जन्मताच मुखबधीर असल्याने  तो पाच वर्षांचा असताना  शिक्षण घेण्याकरिता अंडवाणीतील मुखबधीर शाळेत  . पहिले ते चौथी पर्यंत आनंदवन येथील मुखबधीर शाळेत शिक्षण घेतल्या नंतर . या पुढे मी  त्या शाळेत जाणार नाही असे तो आई वडिलांना  इशाऱ्या  मध्य सांगायचं त्यामुळे त्याला दाखल झाला. चंद्रपूर येथील एका मुखबधीर  शाळेत टाकल्यानंतर ५ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण त्याने तिथे घेतले व पुढील शिक्षणाची सोय तिथे नसल्याने  त्याने २ वर्ष  वायरमन या शाखेत तंत्र शिक्षण घेऊन १० वी करीत व संगणक प्रशिक्षणाकरिता परत आनंदवन येथील मुखबधीर विद्यालयात प्रवेश घेतला .

अभ्यासात अतिशय हुशार असणारा गणेश नेहमी सर्वांशी मिळून-मिसळून राहत होता .  त्याची हुशारी पाहून शिक्षकांनी त्याला वर्ग कॅप्टन सुद्धा बनविले .घटनेच्या २ दिवसापूर्वी तो सकाळी ५.३० वाजता उठून नेहमी प्रमाणे फिरायला गेला व ८.३० वाजे परियंत तो वसतिगृहाच्या परिसरात मित्रांसोबत फिरत होता.असे सांगण्यात येते. मात्र जेवणाच्या वेळेला त्याची अनुपस्थिती पाहून प्रभारी व्यवस्थापक यांनी त्याचा शोध घेणे सुरु केला या बाबत त्याच्या आई वडिलांना देखील कळविन्यात आले .पण तो कुठेच आढळून न आल्याने १० तारखेला त्याचे आई वडील आनंदवनात दाखल झाले.व  बराच वेळ शोध घेऊन तो मिळाला नसल्याने ते गावाला परत जात असतांना . आंनदवनातून एका शिक्षकाने त्यांना फोन करून परत येण्यास सांगितले . त्यावेळी आनंदवनातील तलावाच्या बाजूला असलेल्या विहिरीत गणेश चा मृतदेह तरंगत होता .त्यामुळे याची माहिती आनंदवनातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना देताच पोलीस घटन स्थळी दाखल झाले . व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता  उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला .


घडलेला सर्व प्रकार हा संशयास्पद असून गणेश ला कुठलाही मानसिक त्रास नव्हता मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून तो जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत घरी आला होता तेव्हा वसतिगृहाचे अधीक्षक शारीरिक मानसिक त्रास देतात व ते व्यवस्थित घेऊन देत नाही असे दोन हातवारे करून सांगायचा
त्यामुळे शाळेतील अधीक्षकयांच्या लापरवाही ने दडपण घेऊन मुले सदर कृत्य घडले किंवा त्यांनी गणेशला मारले याचा नेम नाही सदर घटनेतील गैरअर्जदार यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिले तरी सदर प्रकरण संदर्भात चौकशी व्हावी व गैरअर्जदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक गणेश चे मामा राजू दादाजी हेडाऊ रा . मालेवाडा ता चिमूर यांनी पोलीस स्टेशनला केलेल्या विनंती अर्जात केली आहे . या बाबत डॉक्टरांना विचारणा केली असता पाण्यात बुडून मृत्यू झालाच प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितले .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे .
त्यामुळे अशा घटनांमुळे आनंदवनातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.