चंद्र्पुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर
येथील कोलसिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा धनादेश गहाळ प्रकरण चंद्रपुरात
चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात अटकेतील आरोपींकडून आतापर्यंत १५ लाख ५०
हजार रुपये जप्त करण्यात आले असून ३२ लाख ७० हजार ३६० रुपये बँक खाते सील
करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चोरी प्रकरणात अटकेत असेल आरोपी किशोर गुलाब
जगताप कडून सोमवारी पोलिसांनी ५० हजार रोख जप्त केले आहे.
कोलसिटी
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेतून तीन धनादेशाची चोरी झाली होती. या
धनादेशावर बँकेचे व्यवस्थापक चायना पोद्दार यांची बनावट स्वाक्षरी करून
प्रत्येकी २० लाख या प्रमाणे ६० लाख रुपये अन्य खात्यावर स्थानांतरण
करण्यात आले होते. हि बाब समोर येताच सहा जणांवर रामनगर पोलिसात गुन्हे
दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आता पर्यंत राष्ट्रवादी चे सोमेश्वर
येलचलवार, किशोर गुलाब जगताप, संजय तुकाराम भोयर,रमेश मेश्राम, विलास
नामदेव लेनगुरे या पाच जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली. या मध्ये ४
जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान तुरुंगात असलेले जगताप
कडून पोलिसांनी ५० हजार रुपये जप्त केले आहे. तर येलचलवार कडून १५ लाख
रुपये जप्त करण्यात आले आहे. तसेच अन्य खात्यांवर स्थानांतर करण्यात
आलेल्या रकमेपैकी ३२ लाख ७० हजार ३६० रुपयांचे खाते सील करण्यात आले आहे.
आता या प्रकरणात आणखी किती मोठे मासे सापडतात या कडे लक्ष लागून आहे.