मूल/प्रतिनिधी:
मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात मुल येथील वनपरीक्षेत्र कार्यालयवर माेर्चा काढण्यात आला. अँड पाराेमिता गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या गंभिर समस्यावर प्रकाश टाकत शेतकरी शेतात रात्राे बे रात्राे डुक्करांसाठी शेतात जागली जातात त्याचीमाेर्चा राेजी सरकारने राेजगार हमी मधुन द्यावी. तसेच शेतकरी डुक्कर मारला तर त्याचेवर फाँरेस्ट ने गुन्हा दाखल करु नये स्वरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरीकाला आहे हेही माेर्चातुन आपल्या भाषनात ठनकावुन सांगीतले. यावेळी शेतकरी तथा श्रमिक एल्गारचे माजी तालुका अध्यक्ष अरुन जराते, श्रमिक एल्गारचे मुल तालुका अध्यक्ष रवि शेरकी यांनी शेतीची बिकट परीस्थीती कथन केली. तर घनश्याम मेश्राम महासचिव श्रमिक एल्गार, विजय सिद्धावार उपाध्यक्ष श्रमिक एल्गार यांची भाषने झाली . एल्गार आँफीस ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा माेर्चा काढण्यात आला. माेर्चात मुल तालुक्यातील टेकाडी,डाेंगरगाव, पडझरी, चितेगाव, येजगाव, चिखली, पिपरीदिक्षित, चकबेंबाळ, येरगाव , जानाळा, चिराेली येथिल शेकडाे शेतकरी बांधव माेर्चात सहभागी झाले हाेते. १ ) वन्य प्राण्यापासुन हाेत असलेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी २) रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यात यावा. ३) शेतकऱ्यांना माेफत साेलर कुंपन देण्यात यावा. ४) ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडाची व्यवस्था करण्यात यावी. या प्रमुख मागण्या माेर्चातुन शासनाकडे करण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका सचिव दिनेश घाटे, संगीता गेडाम, विशाल नर्मलवार, रश्मा गेडाम, रानी भाेयर, यांनी परीश्रम घेतले. उपस्तितांचे आभार मानुन माेर्चा राष्ट गिताने समाप्त करण्यात आला.
Tuesday, November 14, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য