चंद्रपूर / प्रतिनिधी:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मुल वन परिक्षेत्रात जनाळा नियतक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळला.
जनाळा येथील रहिवासी आत्माराम बापू पोरटे यांची गाय दिनांक १४/११/२०१७ रोजी वाघाने ठार मारल्याचा अर्ज क्षेत्र सहाय्यक जानाळा यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज क्षेत्र सहायक आणि वन कर्मचारी यांनी घटन्स्थळी भेट दिली. मृत गायीचे पंचनामा केल्यानंतर सदर परिसराची पाहणी केली असता, जवळच मृत वाघाचे शव आढळून आले. सदर घटना मुल वनपरिक्षेत्र अंतर्गत जानाला उपशेत्रातील जनाला नियातक्षेत्रात कक्ष क्रमाक ३५५ मधे घडलेली आहे. मृत झालेला वाघ अवयस्क असून दुसरया वाघाच्या हल्य्यात मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाघाचे शरीराचा मागील भाग अन्य प्राण्याकडून खाण्यात आले असून, वाघाचा मागचा पाय व शेपूट शरीरापासून दुसऱ्या वाघाने वेगळा केलेला आढळला.
घटनेची माहिती मिळताच श्री मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, श्री गजेंद्र नरवणे, उप संचालक, बफर, ताडोबा, श्री पी एस शेळके, सहायक वनसंरक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण चे प्रतिनिधी योगेश दुधपचारे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शेषराव बोबडे यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली. वाघाचे शव विच्छेदन डॉ संदीप छोन्कर, पशुधन विकास अधिकारी, मुल डॉ रविकांत खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी यांनी केले.
वाघाचे मागील भाग वन्यप्राणी कडून खाण्यात आले असल्याने लिंग कळू शकले नाही. वाघाचा मृत्यू चे प्राथमिक अंदाज दोन वाघातील आपापसातील झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. शव विच्छेदन दरम्यान व्हीसेरा पुढील तपासासाठी घेण्यात आलेला आहे.