उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजीव शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या जीविताचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात परंतु वन्यजीवांची हत्या झाल्यास होणाऱ्या शेतमालाची नुकसानभरपाई मात्र अत्यल्प दिले जाते शिवाय ही भरपाई देखील बऱ्याच कालावधी नंतर दिली जाते.
ह्या अन्यायाविरोधात राजुरा तालुक्यातील शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली मागील ८ दिवसापासून वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले असून आमदार अँड संजय धोटे ह्यांनी ह्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.ह्यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे प्रशन योग्य असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ह्या मागण्या आणून देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू व आगामी अधिवेशनातही शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देवू.
शेतकऱ्यावर अन्याय होवू न देण्याचीच शासनाची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.ह्यावेळी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा शहर महामंत्री सय्यद कुरेशी,मंगेश श्रीराम,बाबुराव जीवने,अनिल दुबे,कैलास कार्लेकर उपस्थित होते.
उपोषणकर्त्याच्या वतीने उपोषणकर्ते व माजी जि.प.सदस्य गणेश झाडे ह्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या आमदार मोहदया समोर मांडल्या.ह्यावेळी तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.