সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 16, 2017

जिल्हा परिषद चंद्रपूर व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
 दिवसेंदिवस तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण त्यामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम यापासून भावी पिढीला दूर सरसावुन सामाजिक बांधिलकीतु न सलाम फाऊंडेशन मुंबई आणि जी.प.शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विध्यमाने जिल्ह्यातील गटशिक्षणाधीकारी व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची कार्यशाळा जी.प.सभागृह चंद्रपूर येथे पार पडली.

   या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा.राम गारकर शिक्षणाधीकारी (प्राथ) ,मा.डॉ.कैलाश नगराळे जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक चंद्रपूर व कासर्ला गट शिक्षणाधीकारी पोंभुर्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तंबाखूमुक्त हायस्कूलचे मुख्याध्यापक जांभूळकर  यांच्या उपस्थीतीत या कार्यशाळेच्या कार्यक्रमाची प्रास्तावीक मा.आदेश नांदविकर सलाम फाऊंडेशन मुंबई जिल्हा समन्वय यानी केले व या कार्यशाळेचे संचलन मा.जहीर खाँन तज्ञ मार्गदर्शक तर या कार्यशाळेचे शेवटचे संभाषण म्हणजे आलेल्या कार्यशाळेतील प्रमुख पाहुणे यांचे आभार प्रदर्शन मा.हरिश्चंद्र पाल म.रा.व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त यांच्या सुमधुर वानीतुन आभार प्रदर्शन केले.
आभार प्रदर्शन मा.पाल करतेवेळी जिल्ह्यातील तालुकाच नाही तर महाराष्ट्रा बरोबर भारतातील नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न राहावी यासाठी "सलाम मुंबई फाऊंडेशन "तर्फे ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’ जिल्हा परिषद चंद्रपूर सभागृह येथे राबविण्यात आला
सलाम मुंबई फाऊंडेशनचे संपूर्ण जिल्ह्यातील तालुके तंबाखूमुक्त बनविण्याचा नारा "सलाम फाऊंडेशनतर्फे कार्यशाळेत देण्यात आला असून या अभियानात तालुक्यातील दोन मुख्याध्यापक शिक्षकाना प्रशिक्षण देण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात दर सोळा सेकंदाला एक भारतीय मूल तंबाखूजन्य पदार्थांचे पहिल्यांदा व्यसन करीत असते. तंबाखूजन्य पदार्थांत असणार्या चार हजारांहून अधिक रसायनांमुळे पुढे जाऊन तंबाखू पदार्थ सेवन करणार्या व्यक्तीस पुप्फुसांचे विविध विकार, हृदयविकार, 17 प्रकारचे कर्करोग, गँगरीन, पुरुषांना नपुंसकता, स्त्रियांमध्ये वंध्यत्व असे अनेक जीवघेणे आणि खर्चिक आजार होतात. तंबाखूमधील निकोटीन रसायनामुळे सवय जडते; पुन्हा पुन्हा तंबाखू सेवन करण्याची तलब व्यक्तीस येते. माणूस तंबाखूच्या अधीन होतो. सरतेशेवटी भयानक अशा मृत्यूच्या जबड्यात अडकला जातो. कुटुंबाचीदेखील वाताहत होते. कर्करोग हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी येणार्या रुग्णांत 95 टक्के रुग्ण हे तंबाखूचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सेवन करणारे असतात.
शालेय विद्यार्थांना प्रतिबंधात्मक स्तरावरच या जीवघेण्या तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी, मुलांमध्ये व्यसनांविरोधी मानसिकता तयार व्हावी, पुढे विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाला व्यसनमुक्त बनवावे, यासाठी जिल्ह्यात   तंबाखूमुक्त शाळा अभियान अत्यंत संवेदनशीलतेने कार्यशाळा राबविण्यात आले.
 जिल्हास्तरावर गटशिक्षण अधिकारी आणि मास्टर ट्रेनर्स तर तालुकास्तरावर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांना  प्रशिक्षणे देण्यात आले  आहे.
 या अभियानामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अधिकारी तंबाखूमुक्त बनला पाहिजे "सलाम मुंबई फाउंडेशन" मुळ हेतु होता.
  तालुक्याच्या गावातील शाळामध्ये ठरवून दिलेल्या या कार्यशाळेत सी.बी.द.स.ई.बोर्डाने व्यसनमुक्त नियंत्रण शाळेचे ११ निकष कोणती ? व त्यांची पूर्तता कशी करावी.सोबतच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवणाचे दुष्परिणाम विध्यार्थ्याँच्या लक्षात  आणून त्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी ब्रुशवयाचे प्रयत्न व पाविषयाचे मार्गदर्शन करून तालुक्यातील  प्रत्येक शाळेतील दोन मुख्याध्यापक यांना  प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त शाळा बनविण्यासाठी प्रयत्न करावे या मागचा मुख्य हेतु  होता असॆ मा.हरिश्चंद्र पाल यानी मनसुबे उधळण आभार प्रदर्शन करतानी म्हटले आहे.
 या कार्यशाळेच्या यशस्वितेंकरीता शिक्षणविस्तार आधिकारी माशेलकर मँडम ,आदेश नांदविकर ,हरिश्चंद्र पाल,जहीर  खान व जे.डी.पोटे यांच्या अथक परिश्रमातुन "सलाम फाऊंडेशन व जिल्हा परिषद" यांच्या संयुक्त विध्यमाने ही तंबाखूमुक्त कार्यशाळा संपन्न झाली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.