সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

जिओ कपंनी विरोधात पोलीसांत तक्रार

प्रभाग क्रमांक -५ मधील अनाधिकृत खोदकाम प्रकरण 

चिमूर तालुका प्रतिनिधी:
                                 देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी असलेली जिओ मोबाईल कंपनी विरोधात चिमूर नगर परिषदेने पोलिसात तक्रार केली आहे . चिमूर नगर परीषद क्षेत्रात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमीटेड कंपनीचे ऑप्टीकल केबल पसरविण्याचे काम सुरु आहे हे काम रचणा इंटरप्रायजेस नागपुर यांच्या मार्फत करण्यात येत आहे  . प्रभाग क्रमांक ५ मधील मानीक नगर येथे नगर परिषदेस कोणतीही पुर्वसुचणा न देता हजारे पेट्रोल पंप पुढील मेन रोड ते टॉवर पर्यंत अनाधिकृत खोदकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशीक व नगर रचणा अधीनियम १९६६ चे कलम ५२ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदविण्या करीता नगर परीषदेने  जिओ कंपनी विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
jio optical fiber line साठी इमेज परिणाम

   डिजीटल इंडीया अंतर्गत अनेक कंपन्या आपल्या नेटवर्कचे जाळे सर्वदुर पसरवित आहेत . चिमूर नगर परीषद क्षेत्रात सुद्धा रिलायन्स जिओ इनफोकॉम लिमीटेड , चे केबल पसरविण्याचे काम नागपुर येथील रचणा इंटरप्रायजेस द्वारे सुरु आहे . मात्र ह्या कंपन्या पुर्ण नगर परीषद क्षेत्रात केबल करीता खोदकाम करण्या करीता परवाणगी घेत नाही . यामुळे नगर परीषदेच्या अधिकारांचे हनन होत असते .कंपनी तर्फे हजारे पेट्रोल पंप पुढील प्रभाग क्रमांक .५ मधील मानीक नगराच्या मेन रोडपासुन तर टॉवर पर्यंत खोदकाम करीत असल्याचे काँग्रेस गटनेता नगरसेवक कदीर शेख व विनोद ढाकुणकर यांच्या निदर्शणात आले.

      शेख आणी ढाकुणकर यांनी खोदकाम करण्या करीता रितसर नगर परिषदेची परवाणगी घेतली किंवा नाही या विषयी चौकशी केली असता कोणत्याही परवाणगी किंवा पुर्व सुचणे शिवाय खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळाली . या प्रकारा विषयी मुख्याधिकारी यांचेकडे तक्रार करूण नगर परीषद अधिनियमाचे उल्लघंन केले असल्याचे निदर्शनात आनुण दिले  कंपनी व कंपनीच्या प्रोप्रायटर एच.एम . सत्यनारायण यांच्या विरोधात चिमुर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली . यावरून मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी चिमूर पोलीस स्टेशन मध्ये कंपनी ने कोणतीही पुर्वसुचणा न देता नगर परीषद हद्दीत खोदकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशीक व नगर रचणा अधिनियमाच्या कलम ५२अतंर्गत फौजदारी गुन्हा नोंदविण्या विषयी तक्रार दाखल केली . या प्रकरणात पोलीस आता जिओ कंपनी विरोधात काय कार्यवाही करतात याकडे चिमूर करांचे लक्ष लागले राहणार आहे .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.