कृषी, मत्स्य उमेद,आत्मा आदी विभागाची घेतली बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:-
चंद्रपूर जिल्हृयातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकऱ्यासाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,असे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी आज कृषी, मत्स्यविभाग,आत्मा,उमेद आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून शाश्वत शेतीचे महत्व सांगीतले आहे.त्यामुळे दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या योजनांच्या संदर्भात जागरुकतेने लक्ष घालवण्याचे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार,शेततळे,विविध योजनेतून बंधारे,नाला खोलीकरण आदी योजना शेतकऱ्यांना कायम मदत करणाऱ्या असून याकडे आवर्जून लक्ष वेधावे,असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयात फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.या घटनाक्रमांची चौकशी करुन ज्यांना जीवीनहाणी झाली असेल अशांना शासकीय मदत तातडीने मिळेल,याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयात शेतकत्यांसाठी भाजीपाला,दुग्ध उत्पादन,मत्स्यपालन आदी व्यवसायात शेतकरी येथील यासाठी त्यांना आत्मा,मार्फत योग्य प्रशिक्षण मिळावे,जोडधंदयात त्यांना आवड निर्माण व्हावी व प्रत्यक्षात या सर्वाची रोजगार निर्मितीत भर पडावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्ड व्हीजीट,वर भर दयावी,असे आवाहन त्यांनी केले.
औषधी व बियाणे विकी करतांना बंदी घातलेल्या व चुकीच्या बियाण्यांची विक्री होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा.कठोर कारवाई करा.शेतकऱ्यांना यासाठी भुर्दड बसता कामा नये,असे आवाहन अहीर यांनी केले.
बचत गटामध्ये जिल्हयातील महिलांनी मोठया प्रमाणात कार्य केले आहे.बॅकॉची देणी वेळेवर चुकवली आहे.त्यामुळे महिला बचत गटांना बँक पतपुरवठा करण्यास तयार आहे.शेतीला पूरक असणाऱ्या अनेक योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, सभापती अर्चना जीवतोडे, दक्षाता समितीचे सदस्य खुशाल बोंडे,जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे शिवदास ,जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे साहायक संचालक मगर, जिल्हा मत्स्य अधिकारी जांबुळे,यांच्यासह पं.स.सदस्य महेश टोंगे,प्रवीण ठेंगणे,राहुल सराफ, विजय वानखेडे,नरेंद्र जीवतोडे आदी उपस्थित होते.