
राज्यातील शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोग गठीत करण्यात आला असून, सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल म्हणजेच ‘पाशा पटेल’ यांची या आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेल्या जूलै महिन्यात नियुक्ती करण्यात आली आहे.या आयोगाच्या माध्यमातुन करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधित्व याचा विचार करून पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाशी समकक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.