- ठळक घटना आणि घडामोडी
- १६४२ : न्यूझीलंडचा शोध.
- १९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर
- १९३० :’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
- २००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
- २००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.
- सोळावे शतक
- १५४५ - ट्रेंटची समिती सुरू.
- १५७७ - सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.
- सतरावे शतक
- १६४२ - एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलँडला पोचला.
- एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.
- विसावे शतक
- १९३७ - दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
- १९३८ - ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
- १९३९ - दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लँग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९७४ - माल्टा गणतंत्र झाले.
- १९७७ - अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
- १९८१ - पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
- १९९६ - कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
- २००० - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.
- एकविसावे शतक
- २००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
- २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- २००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया,
- लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
- २००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
- २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.
- जन्म
- १५२१ - पोप सिक्स्टस पाचवा.
- १५३३ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
- १५५३ - चौथा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८५ - हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
- १६७८ - याँग्झेंग, चीनी सम्राट.
- १८१६ - वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणार्या सीमेन्सचा जन्म
- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
- १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
- १८९९ :पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer), ’हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ’छाया’, ’धर्मवीर’, ’प्रेमवीर (१९३७)’, ’ज्वाला (१९३८)’, ’ब्रह्मचारी’, ’ब्रँडीची बाटली (१९३९)’, ’देवता’, ’सुखाचा शोध (१९३९)’, ’लग्न पहावं करुन (१९४०)’, ’अर्धांगी (१९४०)’, ’पहिला पाळणा’, ’भक्त दामाजी (१९४२)’, ’पैसा बोलतो आहे (१९४३)’, ’रामशास्त्री (१९४४)’, ’लाखारानी (१९४५)’, ’चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले.
- १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा
- १९२० :तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित
- १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
- १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका
- १९५५ : मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री
- मृत्यू
- १०४८ - अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
- ११२४ - पोप कॅलिक्स्टस दुसरा.
- १२०४ - फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड
- १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
- १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
- २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.
- २०११ : लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी
- प्रतिवार्षिक पालन
- माल्टा - प्रजासत्ताक दिन
- नागरी संरक्षण दिन
Monday, November 13, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য