चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. चंद्रपूरला तयार होणारी वीज चंद्रपूर येथील जनतेलाच महागात घ्यावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद पडलेले आहेत यामुळे येथील उद्योगांचे बाहेरील राज्यात स्थालांतरण झाले त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात विविध थर्मल प्लांट मध्ये अंदाजे ५५०० मेगाव्याट वीज उत्पादन होते त्यासाठी त्यांनी लाख टन दररोज जाळल्या जाते याचे प्रदूषण जिल्ह्यातील जनता सहन करते या प्रकल्पासाठी 60 हजार एकर जमीन चंद्रपूर येथील जनतेनी दिलेली आहे, या प्रदूषणामुळे येथील जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील तापमाणात वाढ होते , या थर्मल पावर प्लांट मुळे येथील जनतेची आयु दर दहा वर्षाने कमी होत आहे असे एका सर्वेक्षणात आढळून आले इतके. म्हणून आज या महत्वपूर्ण मागणीसाठी चंद्रपूर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला 200 युनिट वीज मोफत तसेच त्यावरील वीज ही त्याच्या उत्पादन खर्च 2.५० रुपये इतक्या शुल्कात देण्यात यावे यासाठी आज मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देत चर्चा केली या प्रसंगी माजी नगरसेवक बलराम डोडाणी,विलास वनकर, इरफान शेख , अशोक खडके, कारणसिंग बैस यांची उपस्तिथी होती.