সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 03, 2018

केरळच्या पूरपिडीतांना चंद्रपूरकर देणार मदतीचा हात

चंद्रपुरात केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटीची स्थापना
जिल्हावासीयांनी स्वयंस्फुर्तीने मदत करण्याचे हंसराज अहीर यांचे आवाहन 
चंद्रपूर/प्रतिनिधी:-
केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घालीत प्रचंड प्रमाणात वित्त मनुष्य हानी झाली आहे. या राज्यातील पूरपिडीतांचे अश्रु पुसण्यासाठी त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांचे उद्ध्यस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य  देऊ केले आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी चंद्रपूर जिल्यातील  नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीचा हात वेळोवेळी दिला आहे. आताही असेच योगदान देण्याच्या अनुषंगाने दि. 31 ऑगस्ट रोजी स्थानिक आय.एम.ए. हॉल येथे बैठकीचे आयोजन करून ’’केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटी, चंद्रपूर’’ची स्थापना करण्यात आली. या कमिटीच्या माध्यमातून निधी संकलन करून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सदर निधी केरळ राज्यात पाठविण्यात येणार असल्याने जिल्हावासियांनी मानवीय दृष्टकोनातून जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
या बैठकीत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नानाजी शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा गटनेते राहुल पावडे, मधुसुदन रूंगठा, विजय राऊत, दामोधर मंत्री, रामकिशोर सारडा, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. एम.जे. खान, जार्ज कुट्टी लोकोज, रितेश तिवारी, राजू पुथुवीट्ठील, प्रमोद लुनावत, रघुवीर अहीर यांचेसह मनपा नगरसेवक व विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारयांनी ची प्रमुख उपस्थिती होती.
केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटी, चंद्रपूर या समितीचे गंगा टॉवरस्, अहीर कॉम्प्लेक्स, कस्तूरबा रोड, चंद्रपूर येथे कार्यालय सुरू करण्यात आले असुन या कार्यालयात मदत निधीचे संकलन करण्यात येणार आहे. केरळ राज्यातील नागरिकांना मदतीचा हात देवू इच्छितांनी या कार्यालयात आपली मदत निधी रोख व धनादेशाच्या माध्यमातून जमा करण्याचे यावेळी ठरविण्यत आले. हे कार्यालय पुढील 15 दिवस सुरू राहणार आहे. चंद्रपूर शहरवासीय याप्रसंगीही मोठ्या प्रमाणात निधी जमा करतील असा विश्वास ना. अहीर यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीस आएमए रोटरी क्लब, महेश सेवा समिती, रेल्वे यात्री संघर्ष समिती, एमआयडीसी असोसिएशन, लायन्स क्लब, जेसीस, चांदा को ऑपरेटीव इंडस्ट्रीयल इस्टेट, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ट्रॅव्हल्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, चेम्बर ऑफ कॉमर्स, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, विविध समाज संघटन, पुज्य सिंधी पंचायत, अयप्पा मंदिर कमेटी, अग्रसेन समाज, महावीर सेवा समिती, बोहरा समाज समिती, कृषि केंद्र असोसिएशन, कोळसा असोसिएशन, जिल्हा माहेश्वर संघटन तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.