2 वाहनासह आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
छुप्या मार्गाने कत्तलीसाठी जाणाऱ्या 10 बैलांना चंद्रपुर येथील गुडमॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुटका करण्यात आली.भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून चंद्रपुरातील जुनोनावरून चंद्रपूरकडे 10 बैल 2 पिकअप वाहनात जनावरांना कोंबून त्यांची तस्करी होत असल्याची माहिती बाबूपेठ येथील गुड मॉर्निंग पथक तसेच बजरंग दल बाबूपेठ यांना मिळाली. त्या आधारे त्या दोन्ही पिकअप वाहनांना थांबवून तपासणी केली असता त्या वाहनात मोठ्या प्रमाणात जनावर आढळून आले. याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहन आपल्या ताब्यात घेतले. सध्या या जनावरांना लोहारा येथील गोरक्षण केंद्रात सोडण्यात आले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.या आधीदेखील गुडमॉर्निंग गृपच्या माध्यमातून बाबूपेठ येथे एका इसमावर मधमाश्यांनी हल्ला केला होता त्यावेळी देखील गुडमॉर्निंग गृपच्या माध्यमातून त्या इसमावर तत्काळ उपचार करण्यात आले.मागील 3 महिन्यांपासून याच अश्या प्रकारे तस्करी करण्यात येत होती.मात्र ते हाती लागत नव्हते.बुधवारी हाच प्रकार घडला असता.गुडमॉर्निंग गृपच्या माध्यमातून या तस्कऱ्यांना पाठलाग करून पकडण्यात आले.