चंद्रपूर- दि. 22 नोव्हेंबर 2017 रोजी नवोदिता चंद्रपूर या संस्थेने श्रीपाद प्रभाकर जोषी लिखित रंगबावरी या नाटकाचा प्रयोग सादर केला. रंगबावरीच्या सर्वांगसुंदर सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली व स्पर्धेत रंग भरले. रंगबावरी ही दिवाकर वैद्य या हौषी रंगभुमीवरील एका रंगकर्मीची कहाणी आहे. अनेक वर्शापासून राज्य नाटय स्पर्धेत आपल्या नटराज ग्रुपतर्फे सातत्याने सहभाग नांेदविणारे दिवाकर वैद्य नाटकाषी समर्पित आहे. आपली मुलगी नेहासाठी ते व्यावसायिक रंगभूमीचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी तिच्या लहानपणापासून ते तिच्यावर मेहनत घेत आहेत. कलावंतांचे बेहिषेबीपण त्यांच्यातही रुजलेलं आहे. त्यांचा संसार ठिकठाक असला तरी समृध्द नाही. भविश्याची काळजी कर असं सूचन त्यांची पत्नी मेघना त्यांना करीतही असते. नेहासुध्दा वडीलांच्या स्वप्नाला प्रतिसाद देवून व्यावसायिक रंगभूमीचे स्वप्न जोपासत आहे. यावर्शी त्यांच नाटक राज्य नाटय स्पर्धेत प्राथमिक फेरीला पहिलं आलं आहे. त्यात नेहाला रौप्यपदक मिळालं आहे. दिवाकरभाऊंनी नेहासाठी खास भूमीका लिहून घेतली आहे. अंतिम फेरीसाठी त्यांची तयारी जोराहने सुरु आहे. एकेदिवषी तालीम सुरु असताना सगळयांसाठी समोसे आणायला गेलेल्या दिवाकरचा अपघात होतो आणि हाॅस्पीटल मध्ये काही दिवस संघर्श केल्यावर त्यांचा मृत्यु होतो. या काळात अपुÚया पैषांमुळे आपण आपल्या वडीलांना वाचवण्यात कमी पडलो या जाणीवेनं नेहाचं भावविष्व बदलते आणि ती नाटकात कधीही काम करणार नाही अषी भूमीका घेते. नेहाचं नाटक नाकारणं, दिवाकरचा वारसा चालू ठेवण्यासाठी मेघनाची धडपड आणि निर्धार आणि नेहाचं अखेरीस पुन्हा आपल्या भूमीकेत आगमन हा या नाटकाच्या संघर्शाचा भाग आहे. या नाटकात होणारी नाटकाची तालीम हा अतिषय रंजक भाग असून त्याने प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतलानाटकाची प्रकाष योजना लक्षवेधी होती तर त्याला संगीताची अनुरुप जोड लाभली. एका रंगकर्मीचा घराचा तालीम हाॅल, नेहाची अभ्यासाची खोली या बाबी नेपथ्यकाराने सुरेख खुलविल्या. दिग्दर्षक डाॅ. जयश्री कापसे गावंडे यांनी आपल्या दिग्दर्षकीय कौषल्याने प्रत्येक प्रसंग जिवंत उभा केला. तालमीदरम्यान प्रकाष योजनाकार व संगीत नियोजक ही दोन पात्रे त्यांनी मंचाच्या समोरील भागात बसवून जो अचूक परिणाम साधला तो निष्चितच कौतुकास्पद आहे. नाटकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कलावंतांचा अभिनय. नाटकातील प्रमुख पात्र असलेली नेहा बकूळ धवने हिने प्रभावीपणे साकारली. आपल्या प्रगल्भ अभिनयाने तिने प्रसंगी पे्रक्षकांच्या डोळयात पाणी आणले. श्रीपाद जोषी, नूतन धवने, जयंत वंजारी, चैताली बोरकुटे, जयेष देषमुख, सुरज रंगारी, सर्वेष जुमडे, अक्षय नल्लुरवार या कलावंतांनी प्रभावी अभिनय करत नाटकाला उंची बहाल केली. लेखक श्रीपाद जोषी यांनी या नाटकाच्या माध्यमातून हौषी रंगभूमीचे महत्व अधोरेखीत करत त्यामाध्यमातून रंगकर्मींना दिलेला संदेष व रसिक मनाचा घेतलेला वेध अतिषय महत्वपूर्ण आहे. एकूणच नवोदिताचे रंगबावरीचे सादरीकरण स्पर्धेत रंग भरत वेगळी उंची गाठलीरंगबावरी या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद ही आणखी एक उल्लेखनिय बाब. या नाटकाला लाभलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व झालेली तिकीट विक्री राज्यभरातील तिकीट विक्रीचे उच्चांक मोडले. निकालाअंती
रंगबावरी बक्षिसांच्या मालिकेत किती रंग भरेल हे वेळच ठरवेल.