সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 10, 2018

आता शेतकऱ्यांची अडचण सोडवणार किसान कॉल सेंटर


Image result for किसान कॉल सेंटर' मुंबई/प्रतिनिधी:
कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या 'किसान कॉल सेंटर' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले आहे.
हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४ विभिन्न ठिकाणी कार्यरत आहे. यासाठी ११ आकड्यांचा टोल फ्री क्रमांक १८००-१८०-१५५१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर देशातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही मोबाइल/लॅन्डलाइन नेटवर्कवरून मोफत कॉल करता येतो. ही सेवा दररोज सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये निरंतर सुरू असते. या क्रमांकावरून देशभरातल्या विविध २२ स्थानिक भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी पुणे मुख्यालयी कार्यरत किसान कॉल सेंटरवरून मराठी व कोकणी या दोन भाषेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. दररोज दोन शिफ्टमध्ये चालणारे हे कामकाज ७२ विषयांच्या तज्ज्ञांच्या मदतीने चालविले जाते. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व माहितीसोबतच शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्यांवरदेखील समुपदेशन केले जाते.
किसान कॉल सेंटरचा प्रतिनिधी फार्म टेली अॅडव्हायजर (एफटीए) म्हणून ओळखला जातो. हा प्रतिनिधी कृषी किंवा कृषी मान्यताप्राप्त कृषी फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ मत्स्यव्यवसाय/ कुक्कुटपालन/ मधमाशी पालन/ रेशीम उद्योग/ कृषिअभियांत्रिकी/ कृषिपणन इत्यादी विषयांतील पदवीधर किंवा उच्च पदवीधर असतो.
हे प्रतिनिधी स्थानिक भाषेमध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ताबडतोब प्रतिसाद देतात. फार्म टेली अॅडव्हायजरीद्वारे ज्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकत नाहीत, ते प्रश्न उच्चस्तरीय विशेषज्ञांकडे पाठविले जातात. हे विशेषज्ञ राज्य कृषी विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांचे विशेषज्ञ आहेत. किसान कॉल सेंटरद्वारे कृषिसल्ला व विविध वस्तूंच्या बाजार किमती याबाबत लघु संदेश (एसएमएस) प्राप्तीसाठी एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणीसुध्दा करण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.