সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 11, 2018

चंद्रपुरात गणपतीच्या आगमनासाठी वाजणारा डीजे पोलिसांनी केला जप्त

मंडळाची पोलिसावर नाराजी 
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज 
ललित लांजेवार:
चंद्रपुरात गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी लावून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गंजवार्ड परिसरातील गणेश मंडळावर पोलिसांनी कायदयाचा बडगा उगारलाय. मंगळवारी चंद्रपूर येथील गंजवार्ड परिसरातील नवशक्ती गणेश मंडळाने डीजेच्या तालावर गणपती आगमन मिरवणूक काढली यात गणपतीचे मंडळ आगमन डीजेच्या तालावर करण्यात आले.शहरात डीजेवर बंदी असतांना डीजे सुरु असल्याची कुणकुण शहर पोलीस पथकाला लागताच पोलिसांनी डीजे जप्त केला व गांधी चौक येथील पोलीस स्टेशन समोर आणला. यावेळी पोलीस आणि मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झालीय.






यामुळे गांधी चौक परिसरात तणाव निर्माण झाला असून मंडळांनी आगमन मिरवणूक जाग्यावर थांबवली. जो पर्यंत डॉल्बी वाजत नाही तो पर्यंत मिरवणुका सुरु न करण्याचा निर्धार मंडळांनी घेतला होता. तर पोलिसांनी मंडळांचा डॉल्बी न वाजू देण्याचा मनसुबा आखला आहे. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
यावेळी मंडळातील शेकडो युवक या आगमन मिरवणुकीत सहभागी होते.डीजे जप्त का केला या कारणावरून युवकांनी शहर पोलिस स्टेशन समोर चांगलाच मज्जाव घालत नारेबाजी केली.यावेळी शहर पोलीस स्टेशन समोर चांगलाच जमावडा जमला होता,हि नारेबाजी थांबविण्यासाठी व जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.मिळालेल्या माहिती नुसार सध्या कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे .

गेल्या दोन वर्षा अगोदर गणेश स्थापना व विसर्जनाच्या दिवशी सर्व गणेश भक्त गणपतीबाप्पा मोरया म्हणत डीजेच्या तालावर स्थापना व मिरवणूक काढत होते. अगोदर चंद्रपुरात डीजेला परवानगी असतांना शहरात गणपती बापाच्च्या स्वागतासाठी शेकडो डीजे गणपतीच्या स्वागतासाठी व मिरवणुकीसाठी शहरात आणले जात होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंद म्हणजे बंदच राहील अशी भूमिका चंद्रपूर पोलिसांची होती.सध्या चंद्रपुरात सोशल मीडियावर चंद्रपूरातच डीजे बंद का ? अश्या आशयाचे संदेश फिरत असून यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. गेल्या कधी दिवसाअगोदर डीजे डॉल्बीवर यावर्षीही बंदी कायम असल्याचे स्पष्ट करत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते, मात्र ऐन गणपती आगमनाच्या एक दिवस अगोदर पोलिसांनी डीजे जप्त करण्याच्या कारवाईचा धसका इतर डीजे चालकांनी देखील घेतला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.त्यामुळे इतर गणेश मंडळ या कारवाईकडे कशे बघतात हे येत्या गणेश आगमनाच्या दिवशी समजणार आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.