সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 15, 2018

स्वच्छता ही सेवा अंतर्गत इको-प्रो चे ऐतीहासीक बावडी-विहीरीचे स्वच्छता अभियानास सुरूवात

अभियान स्थळी ना. हंसराज अहिर यांची भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जंयतीनिमीत्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत चंद्रपूर शहरातील ‘ऐतीहासीक गोंडकालीन बावडी-विहीरी स्वच्छता अभियान’ सुरू करण्यात आले. आजपासुन सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानस्थळी ना. हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी भेट देउन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.   

                                         आज महात्मा गांधी यांच्या 150 व्या जंयती निमीत्त देशभरात सुरू झालेल्या स्वच्छता पंधरवाडा 15 सप्टे ते 2 आॅक्टो पर्यत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय स्तरावर सरकारने सुरू केलेल्या अभियानात सहभाग म्हणुन शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन बावडया-विहीरीची स्वच्छता करण्याचे कामास आज सुरूवात करण्यात आली. सदर विहीरी प्राचीन असुन शहरातील बऱ्याच  ठिकाणी आहेत मात्र या दुर्लक्षीत आणी केरकचरा टाकण्याचे ठिकाण झालेले आहे. गोंडराज्य निर्मीती करीत असतांना किल्ला-परकोट सह रामाळा तलाव सोबत शहरात गोंडकालीन पाणी पुरवठा व्यवस्था अधिक प्रभावीपणे तयार केलेल्या दिसुन येतात. अत्यंत महत्वाचे पाण्याचे स्त्रोत आणी पर्यटनदृष्टया महत्वाच्या पायऱ्या च्या विहीरीची निर्मीती केलेली दिसुन येतात.
मात्र दुर्देव की अशा प्राचीन वारसा आणी समृध्द असे जलस्त्रोत जिवंत ठेवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा समृध्द वारसा जतन करण्यास इको-प्रो प्रयत्नशिल असुन आज सदर अभियानास बाबुपेठ बायपास रोड येथील सोना माता मंदीर, मराठा चैकातील प्राचीन विहीर पासुन सुरूवात करण्यात आलेली आहे. या विहीरी सफाईच्या पहिल्या टप्प्यात या विहीरीत वाढलेली झाडे काढण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महानगरपालीकेची मदत घेऊन विहीरीत कचरा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सदर विहीरीतील गाळ काढण्याची आणी त्यावर लोखंडी जाळी लावुन वर शेड तयार करण्याची मागणी महानगरपालीकेकडे करण्यात येणार आहे. सोबतच स्वच्छ झालेल्या या विहीरीत पाणी नागरीकांना वापरता येईल अशी व्यवस्था करण्याची मागणी इको-प्रो ची आहे.
चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन वारसा संवर्धन आणी संरक्षणासाठी इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. मागील 500 दिवसापासुन नियमीत रोज सकाळी श्रमदान करून किल्ला स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. सोबतच गोंडराजे समाधी स्थळ, अपुर्ण देवालय, मेजर कोरहॅम समाधी, ब्रिटीशकालीन सराय इमारत स्वच्छता अभियान तर गोंडकालीन राजमहल आणी सध्याचे कारागृह इतरत्र स्थानांतरण करून सदर राजमहल ‘कैदी मुक्त’ करण्याची मागणी, रामाळा तलाव खोलीकरण व सौदर्यीकरण करण्याची, जुनोना जलमहल पुरातत्व विभागाकडुन ताब्यात घेउन सौदर्यीकरण करण्याची मागणी करीत या विषयावर इको-प्रो ने शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सुरू केले आहे.

आज राबविण्यात आलेल्या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचेसह इको-प्रो पुरातत्व विभाग प्रमुख रवि गुरनुले, नितीन रामटेके, नितीन बुरडकर, बिमल शहा, कपील चैधरी, प्रमोद मलीक, सुमीत कोहळे, राजेश व्यास, मनिश गांवडे, अनिल अडगुरवार, ओमजी वर्मा, राजु हाडगे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अमोल उटट्लवार, अतुल रांखुडे, सचिन धोतरे, प्रगती मार्कडेवार, मनीशा जयस्वाल, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, सनी दुर्गे, शंकर पोइनकर, सुनील लिपटे, सुनील पाटील सहभागी झाले होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.