जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविल्या जात आहेत.त्यात जिल्हा परिषद शाळा ने स्वच्छतेचा संदेश गावागावात रुजविण्याचे कार्य करित आहे. नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅली काढून गावातील दुकानदाराना कचरा कुंडी भेट देवून अभिनव उपक्रम राबविला.
शाळा स्वच्छता अभियान पंधरवडा राबविणे सुरू आहेत. त्यात रॅली काढून मुले स्वछतेचा संदेश देत आहे. हे काही गावातील युवकांनी बघितले व त्यांना कल्पना सुचली त्यांनी खाद्य तेलाचा पिपे गोळा करून त्यांना फोडून मुलांना कडे सुपूर्त करणात आले.
मुलांनी याचा चांगला उपयोग कसा होतील या दृष्टीने गावातील रस्त्या लगत असलेल्या पानठेले व दुकानदाराना द्यायचे ठरविले त्यांनी शिक्षका कडून त्या पिप्यावर व्यवस्थित लिहून 16 दुकानदारांना त्या कचरा कुंड्या देण्यात आल्या एवढेच नाही तर मुलांनी कचरा इकडे तिकडे रस्त्यावर न टाकता या कचरा कुंडी मध्ये टाका असा मौलिक संदेश दिला.
यावेळी गावचा सरपंच सौ दुर्गा कांबळी, ग्रा. प.सदस्य सत्तार शेख, देवाजी सहारे, गिरीश मडकाम, मनीष अरतपारे, दीपक खोब्रागडे, विशाल मडकाम, राजूकुमार उईके, तानाजी देवगडे गावातील नागरीक व शिक्षक वृंद उपस्थित होते.