एकही गाव व बाधीत शहरे सोडू नका
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निर्देश
प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजने अंतर्गत प्राप्त 313 कोटींचे वितरण करतांना ज्यांचा पहिला अधिकार आहे असे जिल्हयातील 601 गावांना नियमानुसार एकुण निधीच्या 66 टक्के निधी वितरीत करावा त्यात एकही गांव व बाधीत शहरे सुटता कामा नये असे स्पष्ट व सक्त निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्राी यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजना अंतर्गत जिल्हयाला प्राप्त निधीचा आढावा बैठकीच्या अनुषंगाने अधिकाÚयांना दिले.
जिल्हयातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व ग्राम पंचायत सरपंचांनी याबाबतीत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी गावाच्या गरजेनुसार आपले प्रस्ताव जिल्हाधिकाÚयाकडे अंदाजपत्राकांसह सादर करावे अशी सुचना ना. अहीर यांनी केली. बाधीत क्षेत्रामध्ये शुध्द पिण्याचे पाणी ही मोठी गरज असून आर.ओ. वाॅटर एटीएम बाधीत गावात लावण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. बाजार ओटयांचे सौदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलार विद्यूत व्यवस्था करण्यास भर देण्यात यावा असेही त्यांनी सुचविले. पांदन रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदन रस्ते घेण्याची मोठी संधी बांधीत गावांना उपलब्ध आहे याची आठवन ना. अहीर यांनी करून दिली.
हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधीत व अप्रत्यक्ष बाधीत गावांना व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल असे मत बैठकीत व्यक्त केले. प्रधानमंत्रयांनी प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजनेच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी दिली असून त्याचा सर्वात जास्त लाभ चंद्रपूर जिल्हयाला होणार आहे. त्यामुळे अधिकाÚयांनी नियमानुसार आराखडयात कामे समाविष्ट करावीत असे निर्देश अधिकाÚयांना दिले. या बैठकीला आ. नानाजी शामकुळे, जिल्हाधिकारी श्री. खेमकर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.