महावितरणच्या विद्युत यंत्रणेमुळे शॉक लागून झालेल्या प्राणांकीत आणि अप्राणांकीत अपघाताप्रकरणी मौदा विभागातील चार जणांना एकूण ४ लाख ८० हजाराच्या नुकसान भरपाईचे वाटप नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीष देशमुख यांच्या हस्ते मौदा येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात नुकतेच करण्यात आले.
वामन बुरडे यांच्या म्हशीला विदुयत धक्का लागल्याने मृत्यू झाला होता, त्यांना ३०,००० रुपये, सुरेश घरझाडे यांच्या म्हशीला विदुयत धक्का लागल्याने मृत्यू झाला होता, त्यांना २०,००० रुपये मृतक मधुकर भोयर यांचा मुलगा आकाश याला ४ लाख रुपये, गुलाब दादुरे यांच्या गायीच्या मृत्यू प्रकरणी ३०,००० हजार रुपयांचा धनादेश प्रा, गिरीष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांचेसमवेत प्रितिश वंजारी, अभिजीत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.