भद्रावती (जि. चंद्रपूर) - तालुक्यातील सायवन या अवघ्या पाचशे लोकसंख्येच्या गावातील आदिवासी महिलेवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (ता.3) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित चाळीस वर्षीय महिला मोलमजुरी करून सायवन गावातील झोपडीत एकटीच राहते. सोमवारी रात्री ती महिला झोपडीत झोपलेली असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास जवळच असलेल्या घोडपेठ गावातील संतोष थेरे (वय 22), प्रवीण विरदंडे (वय 24) आणि हेमंत कडस्कर (वय 25) या तिघांनी जबरदस्तीने दार उघडून झोपडीत प्रवेश केला. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला तसेच अनैसर्गिक कृत्यही केले. या घटनेमुळे सायवन गाव तसेच आजूबाजूचा परिसर सुन्न झाला असून, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून भंगार विकणे तसेच गावात दमदाटी करण्याचे काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.