नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म नोव्हेंबर १, इ.स. १९४५ रोजी सातारा जिल्यात झाला . ते मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येत आहे. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळामध्ये अजातशत्रू असेच दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व होते.
नरेंद्र दाभोलकर | |
---|---|
जन्म | नरेंद्र नोव्हेंबर १, इ.स. १९४५ सातारा |
मृत्यू | ऑगस्ट २०, इ.स. २०१३ पुणे |
मृत्यूचे कारण | अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | मिरज वैद्यकीय महाविद्यालय |
पेशा | वैद्यकीय |
मूळ गाव | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोली |
ख्याती | साधना (साप्ताहिक) |
पदवी हुद्दा | संपादक |
कार्यकाळ | १ मे १९९८ ते पासून |
पूर्ववर्ती | वसंत बापट |
धर्म | हिंदू |
जोडीदार | शैला |
अपत्ये | डॉ मुग्धा दाभोलकर देशपांडे(कन्या); हमीद(पुत्र) |
वडील | अच्युत लक्ष्मण दाभोलकर |
आई | ताराबाई अच्युत दाभोलकर |
नातेवाईक | डॉ. देवदत्त दाभोलकर(बंधू) |
संकेतस्थळ www.antisuperstition.org |