সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 09, 2013

कोलकत्त्याच्या कारागिराने उभारला द्वारकाधीशांचा महाल

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात
चंद्रपूर- आजपासून चंद्रपुरात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पुढील दहा दिवस गणरायाची मनोभावाने आराधना केली जाणार आहे. त्यानिमित्ताने आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाली असून विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा 'चंद्रपूरचा राजा' म्हणून नावारुपास आलेल्या जटपुरा गणेश मंडळाने स्थापित केलेला भव्यदिव्य गणराया भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. मंडळातर्फे यावर्षी द्वारकाधिशांच्या राजवाड्याची प्रतिकृती केली असून त्यासाठी कोलकत्त्याच्या कारागिराला पाचारण करण्यात आले होते. हा द्वारकाधिशांचा महल आता पहिल्या दिवसापासूनच भाविकांच्या सेवेत रुजू होणार आहे, अशी माहिती जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले व शिवसेना नेते दिलीप कपूर यांनी पत्रपरिषदेत दिली.
जटपुरा युवक गणेश मंडळातर्फे १९७४ पासून गणेशाची स्थापना करण्यात येत असून यंदाचे हे ३९ वे वर्ष आहे. नवसाला पावणारा गणेश म्हणूनही याकडे बघितले जाते. प्रारंभी सव्वा रुपयाचा गणपती या मंडळाने बसविला होता. मागील तीन महिन्यापासून मंडळाचे कार्यकर्ते यंदाच्या गणेश उत्सवाची तयारी करीत असून त्यांना दर्शनादरम्यान कुठलीही अडचण भासू नये याचीही काळजी यावेळी घेण्यात आल्याचे दीपक बेले यांनी यावेळी सांगितले. 'चंद्रपूरच्या राजा'ची गणना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर व्हावी यासाठी मंडळाने जय्यत तयारी केली आहे. यंदा ७0 फुट उंचीचे भव्य द्वारकाधिशाचे मंदिर व आतील गाभार्‍यातील कलाकृती आकर्षक ठरणार आहे. सिंहासनाधिश्‍वराची मनाला मोहित करणारी र%हिरे जडित १८ फुट उंचीची भव्य मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे दिलीप कपूर यांनी सांगितले. मूर्तीचे वैशिष्टये सांगतांना बेले म्हणाले, संपूर्ण विदर्भात ही एकमेव मूर्ती असून तिला लागणारे ३५ मिटरचे वस्त्र रोज बदलविण्यात येणार आहे. दहा दिवस चालणार्‍या या सोहळय़ात दहा नवनवीन रंगाच्या वस्त्रात, दहा नवीन रुपात या चंद्रपूरच्या राजाचे अनोखे दर्शन भाविकांना घडणार आहे. ही मूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकार म्हणून विजय कोहळे यांनी पर्शिम घेतले, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी मंडळाचे सचिव महेश बेले, सहसचिव विक्रांत पाटील, कोषाध्यक्ष बाळकृष्ण वैरागडे व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.