সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 03, 2013

भद्रावती पालिकेवर शिवसेनेचा भगवा

भद्रावती : भद्रावती निवडणूक निकालाबाबतची उत्सुकता आज दुपारी संपली. सर्व राजकीय गणितं बिघडवीत शिवसेनेने यंदाही भद्रावती नगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला. सात प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीतील २७ पैकी १४ जागांवर विजय मिळवित शिवसेनेने स्पष्ट बहुमत सिध्द केले. त्यांच्या विजयी १४ उमेदवारांपैकी नऊ महिला आहेत, हे विशेष.
या निवडणुकीत चार माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. हे या निवडणुकीचे वैशिष्टय ठरले. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, ज्ञानेश्‍वर डुकरे, चंद्रकला आवारी, सरिता सूर, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अफजलभाई यांना पराभव पत्करावा लागला. भारिपचे सुनील खोब्रागडे चौथ्यांदा निवडून आले. अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणार्‍या प्रभाग क्रमांक एकमधील निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल धानोरकरांनी काँग्रेसच्या अफजलभाईंचा एकतर्फी पराभव केला. शिवसेनेच्या बाबतीत गड आला अन् सिंहही आला, असे घडले. अपक्ष उमेदवार प्रशांत कारेकार यांनी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुकरे तर शोभा सातपुते यांनी माजी नगराध्यक्ष सरिता सूर यांचा, प्रा. संजय आसेकर यांनी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा तर अल्का सातपुते यांनी माजी नगराध्यक्षा चंद्रकला आवारी यांचा पराभव केला.
काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला फक्त चार जांगावर समाधान मानावे लागले. कम्युनिष्ट पक्षाचे दोन पैकी दोनही उमेदवार निवडून आले. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. बसपा व भारिपाने मागील निवडणुकीच्या तुलनेत आपले स्थान कायम ठेवले. मनसे व अकोला विकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही. एक अपक्ष उमेदवार निवडून आला. निकालनंतर लगेच शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. कम्युनिस्ट पक्ष भारिप, बसपा पक्षांच्या उमेदवारांचीही विजयी मिरवणूक काढण्यात आली, अशा रंगल्या प्रभागनिहाय लढती भाजपाचे खातेही उघडले नाही. नगरपालिका होण्यापूर्वी असलेल्या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही. खा. अहीर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु भाजपाचा येथे सफाया झाला.

अशा रंगल्या प्रभागनिहाय लढती
  • घुटकाळा प्रभाग क्र. १ अ गटमध्ये शिवसेनेच्या शारदा ठवसे यांची (२३७८) अधिका पाचभाई (काँग्रेस १३१३) वर मात, ब गट अनिल धानोरकर (शिनसेना २५२६) यांची अफजलभाई (काँग्रेस १४९२) वर मात, क गट- शोभा सातपुते (शिवसेना २३२८) यांची सरिता सूर (काँग्रेस २0५0) वर मात, ड गट- विनोद वानखेडे (शिवसेना २३0४) यांची दत्ता कोंबे (काँग्रेस १३७३) वर मात.
  • ■ आयुधनिर्माणी प्रभाक क्र. २- अ गट- राखी रामटेके (भारिप ७४१) यांची कृपला फुलझेले (शिवसेना ६९९) वर मात, ब गट- सीमा पवार (भाकप ७९९) यांची निर्मला सिरसाठ (भारीप ६५0) वर मात, क गट- संदीप वडाळकर (शिवसेना ९१५) यांची चंद्रकांत पोईनकर (काँग्रेस ६७३)वर मात, ड गट- सुनील खोब्रागडे (भारिप ८४५) यांची रमेश दास (राष्ट्रवादी ८२८) वर मात.
  • ■ डोलारा प्रभाग क्र. ३- अ गट- प्रफुलकुमार गौरकार (बसपा २00२) यांची ज्ञानेश्‍वर दुर्गे (शिवसेना १११0) वर मात, ब गट- नालदा पाझारे (शिवसेना १00२) यांची करुणा सोनुने (बसपा ९६७) वर मात, क गट- सोनिया कामटकर (बसपा १४४६) यांची पुष्पा मानकर (शिवसेना १0८९) वर मात, ड गट- विजय मेश्राम (भारिप १0६३) यांची कासम शेख कासम उस्मान (बसपा ९७४) वर मात.
  • ■ किल्ला प्रभाग क्र ४- अ गट माया नारळे (शिवसेना २२७१) यांची सुषमा शिंदे (काँग्रेस १६५८) वर मात, ब गट- नरेंद्र पढाल (शिवसेना २१८४) यांची मुनाज शेख (राष्ट्रवादी ११६१) वर मात, क गट- ममता उमरे (शिवसेना २४५३) यांची सुलोचना मांढरे (काँग्रेस १९३७) वर मात, डगट- प्रफुल्ल चटकी (शिवसेना २0९७) यांची सुनील पतरंगे (काँग्रेस १२९६) वर मात.
  • ■ विजासन प्रभाग क्र. ५ - अ गट- माधुरी कळमकर (शिवसेना ९५३२) मात माला शेंडे (अपक्ष ९१४), ब गट- अर्चना आरेकर (काँग्रेस ११२४) मात विशाखा पारधे (शिवसेना ८९३), क गट- सुधीर सातपुते (स्वभाप १२७१) मात राजीव सारंगधट (शिवसेना ९७७), ड गट- संजय आसेकर (राष्ट्रवादी १७२0) मात सुनील नामोजवार (१४२६)
  • ■ गजानन प्रभाग क्र. ६ - अ गट राजू गनैवार (कम्युनिस्टपक्ष १४५१) यांची दिनेश वनकर (राष्ट्रवादी ६१९)वर मात, ब गट- प्रमोद गेडाम (राष्ट्रवादी ९४९) यांची देवीदास जांभुळे (बसपा ८४९)वर मात, क गट- अल्का सातपुते (काँग्रेस १३२१) यांची चंद्रकला आवारी (शिवसेना ९८७)वर मात, ड गट- रेखा कुटेमाटे (शिवसेना ११११) यांची सुरेखा पवार (राष्ट्रवादी ८५५)वर मात.
  • ■ गवराळा प्रभाग क्र. ७- अ गट- आशा निंबाळकर (शिवसेना- १२७३) यांची शिला गिरटकर (अपक्ष ६४३)वर मात, ब गट- मिनल आत्राम (शिवसेना १३२२) यांची वनिता वाळके (काँग्रेस ९८३) वर मात, क गट- प्रशांत कारेकर (अपक्ष १३९६) यांची ज्ञानेश्‍वर डुकरे (शिवसेना ९१९)वर मात. या प्रकारे २७ उमेदवार प्रतिस्पध्र्यांवर मात करुन विजयी झाले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.