সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 12, 2013

मीटर लागले; पण शुल्क जुनेच

चंद्रपूर - शहरातील ऑटोरिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम बसावा, यासाठी डिजिटल मीटरची सक्ती करण्यात आली. मात्र, अडीच हजारांपैकी केवळ पाचशे ऑटोंनाच मीटर दिसून येत आहेत. मीटर लागूनही प्रवासी शुल्क आकारणी जुन्याच पद्धतीने सुरू आहे.

ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीमुळे शहरातील प्रवासी पुरते वैतागले आहेत. जवळचे भाडे नाकारणे, उद्धट बोलणे, मनमानी भाडे आकारणे, अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. ऑटोवाल्यांच्या वागणुकीचा प्रत्यक्ष अनुभव दोन दिवसांपूर्वी खुद्द उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला आला. बसस्थानकापासून गांधी चौकापर्यंतचा प्रवास करताना 50 रुपये शुल्क आकारले. त्यांनी हा प्रकार पतीच्या कानावर घातला. यावेळी त्या अधिकाऱ्याने कारवाई केली. मात्र, असे अनुभव सामान्य नागरिकांना दररोज येत आहेत. रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि बाजारपेठ आणि रुग्णालयाच्या परिसरात प्रवाशांकडून जादा शुल्क घेण्याचे प्रकार येथे दररोज होत आहेत. नियमानुसार एक ते दीड किलोमीटरसाठी 12 रुपये ते 15 रुपये दर आकारला जातो. मात्र, ऑटोचालक मीटर लावण्यास नकार देऊन सरसकट रक्कम मागत आहेत.

टीव्ही मालिकेसाठी प्रवाशांना सोडले अर्ध्यावर

दूरचित्रवाहिन्यांचा प्रभाव महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे घरातील कोणतेही काम करताना महिला टीव्हीसमोरच दिसतात. सध्या काही वाहिन्यांवरील मालिकांचा प्रभाव पुरुषांवरही झाला आहे. एका ऑटोचालकाने मालिकेचा एक भाग बघता यावा, यासाठी ऑटोरिक्षात बसलेल्या प्रवाशांना अर्ध्यावर सोडले. घरापासून रुग्णालयात ये-जा करण्यासाठी ऑटो ठरविण्यात आला होता. मात्र, ऑटोचालकाने मालिकेसाठी प्रवाशांना रस्त्यात सोडून दिल्याचा किस्सा प्रवाशाने सांगितला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.